महाराष्ट्र मुंबई

लाल दिवा नाही तर धनंजय मुंडेंचं ‘हे’ आहे स्वप्न!

मुंबई |  बीडच्या परळीमधून भगिनी पंकजा मुंडेंना पराभवाची धूळ चारून जायंट किलर ठरलेले राष्ट्रवादीचे फायरब्रँड नेते धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपद मिळण्याच्या चर्चा बदललेल्या राजकीय समीकरणाच्या पार्श्वभूमीवर जोर धरू लागल्या आहेत. मात्र लाल दिव्यापेक्षा मतदारसंघातील प्रत्येक घरात विकासाचा दिवा लावायचे माझे स्वप्न आहे, असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.

निवडणुकीनंतर प्रथमच धनंजय मुंडे यांनी कार्यकर्त्यांशी परळीतील हालगे गार्डन येथे संवाद साधला. यावेळी त्यांनी परळीच्या घराघरात मला विकास न्यायचा आहे आणि परिवर्तन काय असतं हे जनतेला दाखवून द्यायचं आहे, असं ते म्हणाले.

मतदारसंघातील प्रत्येक शेतकर्‍याला पीक विमा, परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीची भरपाई मिळेपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही, असंही ते म्हणाले.

दरम्यान, भाजपशी युती तोडून देखील सत्तास्थापनेला मुहूर्त लागत नाहीये. त्यामुळे शिवसेना नेते आणि कार्यकर्ते काळजीत आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी दुपारी 12 वाजता महत्त्वाची बैठक बोलावली आहे.

 

 

सर्वज्ञ आयुर्वेद क्लिनिक व पंचकर्म सेंटर, माणिकबाग, पुणे

 

महत्त्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या