कर्जमाफी जाहीर झाल्यापासून 1020 शेतकऱ्यांच्या आत्महत्या

मुंबई |  छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अर्थात शेतकरी कर्जमाफी जाहीर झाल्यापासून राज्यात 1020 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी ट्विट करुन ही धक्कादायक माहिती दिलीय.

2017 सालातील पहिल्या 10 महिन्यांमध्ये तब्बल 2414 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. म्हणजेच रोज सरासरी 8 शेतकरी आपलं आयुष्य संपवत आहेत. 

राज्य सरकार कृषी विकासाच्या बोगस आकड्यांची जाहिरात करत आहे. मग या शेतकरी आत्महत्यांची जबाबदारी का घेत नाही?, असा संतप्त सवाल देखील धनंजय मुंडे यांनी विचारला आहे.