Dhananjay Munde | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी आपल्या प्रकृतीविषयी माहिती देताना गेल्या काही दिवसांपासून त्यांना Bell’s Palsy या आजाराचा त्रास होत असल्याचे जाहीर केले आहे. त्यांनी ट्विटरवर (X) पोस्ट करून सांगितले की, सध्या त्यांच्यावर रिलायन्स हॉस्पिटलमधील (Reliance Hospital) प्रसिद्ध न्युरोलॉजिस्ट डॉ. अरुण शहा (Dr. Arun Shah) यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू आहेत.
काय आहे प्रकरण?
धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी त्यांच्या पोस्टमध्ये सांगितले की, १५ दिवसांपूर्वी त्यांच्या दोन्ही डोळ्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. ही शस्त्रक्रिया पद्मश्री डॉ. टी.पी. लहाने (Dr. T.P. Lahane) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांनी त्यांना तीव्र प्रकाश, धूळ आणि उन्हापासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता.
याच दरम्यान, Bell’s Palsy या न्यूरोलॉजिकल आजाराचे निदान झाले. या आजारामुळे तोंडाच्या स्नायूंवर परिणाम होतो आणि बोलताना अडथळे येतात. त्यामुळेच ते सलग दोन मिनिटेही व्यवस्थित बोलू शकत नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले.
कॅबिनेट आणि पक्षाच्या कार्यक्रमांना गैरहजेरी-
धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी आपल्या प्रकृतीमुळे गेल्या काही दिवसांत काही कॅबिनेट बैठकींसह पक्षाच्या जनता दरबार कार्यक्रमांना हजेरी लावू शकली नाही, अशी माहिती दिली. त्यांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना आधीच कल्पना दिली असल्याचेही सांगितले.
अंजलीताई दमानिया यांनी आज पुन्हा एकदा अर्धवट ज्ञानाच्या आधारे खोटे बोलून काही जीआर काढला वगैरे म्हणून जे आरोप केले आहेत ते संपूर्णपणे चुकीचे असून त्या आपल्या अर्धवट माहितीच्या आधारे सातत्याने खोटे आरोप करत आहेत.
शासनाच्या कार्य नियमावलीनुसार (रुल्स ऑफ बिजनेस) जीआर अर्थात शासन…
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) February 19, 2025
लवकरच पूर्णपणे बरे होऊन कार्यक्षमतेने परतण्याचा निर्धार-
मुंडे यांनी आश्वासन दिले की, आपल्या आजारावर लवकरच मात करून पुन्हा जनसेवेत रुजू होतील. सध्या ते डॉक्टरांच्या सल्ल्याने आवश्यक उपचार घेत असून, लवकरच आपल्या जबाबदाऱ्या सुरळीत पार पाडण्यासाठी तयार होतील, असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला.