Loading...

धनंजय मुंडे शेतकऱ्यांना देणार फक्त 10 रूपयांत जेवण!

बीड |  नाथ फाऊंडेशच्या वतीने चालवल्या जाणाऱ्या स्व. पंडितअण्णा मुंडे शेतकरी भोजन गृहाचा शुभारंभ विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या हस्ते झाला. या योजनेअंतर्गत परळी शहरात कामानिमित्त येणाऱ्या तालुक्यातील शेतकऱ्यांना फक्त 10 रूपयांत जेवण मिळणार आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मोकळ्या प्रांगणात हे भोजनगृह सुरू करण्यात आलं आहे. दुष्काळी परिस्थितीत आर्थिकदृष्या पिचलेल्या शेतकऱ्यांना परळीत आल्यानंतर अल्प दरात जेवण मिळावं आणि त्यांना आधार मिळावा, असा यापाठीमागचा उद्देश आहे, असं धनंजय मुंडे म्हणाले.

Loading...

परळीत खरेदी-विक्री, शेतीविषयक आणि जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी अनेक शेतकरी येत असतात. त्यांना याचा लाभ घेता येणार आहे.

दरम्यान, धनंजय मुंडे यांनी त्यांच्या वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ नाथ प्रतिष्ठानच्या वतीने हा उपक्रम सुरू केला आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

-“महाराष्ट्रातूनच मराठी चित्रपटसृष्टीचं स्वातंत्र्य हिरावून घेतल्यासारखं वाटतंय”

-संकट खूप मोठं आहे… शर्मिला ठाकरे यांच्या प्रशासनाला सूचना

काश्मिर भारताचा अविभाज्य भाग… उगीचच नाक खूपसू नका; अदनान सामीने टीकाकारांना सुनावले

Loading...

-सांगली-कोल्हापूरमध्ये 50 घरं बांधून देणार; मिका सिंगचं पूरग्रस्तांना आश्वासन

-शरद पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; राजकीय वर्तुळात चर्चाणा उधाण

Loading...