बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

येत्या दोन दिवसात बीडमध्ये रेमडेसिवीर उपलब्ध होईल- धनंजय मुंडे

बीड | मागील काही दिवसांपासून राज्यातील कोरोनाची स्थिती बिकट होताना दिसत आहे. विविध जिल्हात बेड्स, रेमडेसिवीर आणि ऑक्सिजन रूग्णांना वेळेवर मिळत नाहीये. यातच आता बीडमधली आरोग्य स्थिती आणखीनच खराब होताना दिसत आहे. यावर आता बीडचे पालकमंत्री आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी रेमडेसिवीर इंजेक्शन लवकर उपलब्ध करून देण्याचं आश्वासन दिलं आहे.

येत्या दोन दिवसात बीडमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध होईल, अशी माहिती पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. तसेच यासह इतर आरोग्य सुविधांच्या बाबतीतील देखील अडचणी दूर होतील, असं आश्वासन देखील धनंजय मुंडे यांनी दिलं आहं. बीड जिल्ह्यामध्ये कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. दुसऱ्या लाटेत अधिक धोका वाढला असून बीडच्या जनतेनं प्रशासनास सहकार्य करावं, असं आवाहनही धनंजय मुंडे यांनी जनतेला केलं आहे.

रेमडेसिव्हीर इंजेक्शनच्या कमतरतेमुळे कोरोनाग्रस्त नातेवाईकांची धावपळ होत आहे. काही दिवसांपुर्वी जिल्हा प्रशिक्षण केंद्राबाहेर नातेवाईकांनी गर्दी केली होती.  बीडमध्ये 350 बेड वाढवले जाणार आहेत. त्याशिवाय लोखंडी सावरगाव येथील कोविड सेंटर पूर्ववत सुरू करण्यात आलं आहे. या बरोबरच अंबाजोगाई इथल्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात 150 बेड वाढवणार आहेत, अशी माहिती धनंजय मुंडे दिली आहे.

दरम्यान, याच मुद्यावरून पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यात ट्विटर वाॅर रंगलं होतं. ताई साहेब, मा. मुख्यमंत्र्यांना व मा. आरोग्य मंत्र्यांना पत्र लिहिण्याऐवजी पूर्ण माहिती घेऊन एखादे पत्र मा. पंतप्रधानांना पाठवावं व लसींचा पुरवठा वाढविण्याबाबत आग्रह धरावा, जेणेकरून कोरोनाविरुद्धच्या या लढाईत खरोखरच आपली मदत होईल!, असं ट्वीट धनंजय मुंडेंनी केलं होतं.

थोडक्यात बातम्या-

तोंडात कोरोनाचे जंतू टाकतो म्हणणाऱ्या शिवसेना आमदाराला फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले…

पंजाबच्या गोलंंदाजांवर गब्बर दहाडला; दिल्लीचा पंजाबवर 6 विकेट्सने दमदार विजय

जे कुठलाही राजकारणी बोलला नाही ते हा माणुस बोलतोय- हेमंत ढोमे

देशाला लागलेली कोरोनापेक्षा घातक कीड म्हणजे राजकारण- तेजस्विनी पंडीत

पुण्यात बापानं 2 पोरींवर ट्रक चढवला अन् स्वतःलाही संपवलं, कारण अत्यंत धक्कादायक

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More