बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

रेणू शर्मांनंतर आता करुणा शर्मा; नव्या आरोपांनी धनंजय मुंडे पुन्हा अडचणीत

मुंबई | सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. कारण धनंजय मुंडे यांची दुसरी पत्नी करुणा शर्मा यांनी मुंबई पोलीस आयुक्तांकडे धनंजय मुंडेंविरोधात तक्रार दाखल केली आहे.

गेल्या तीन महिन्यापासून धनंजय मुंडे यांनी त्यांच्या दोन मुलांना चित्रकूट बंगल्यात डांबून ठेवल्याचा आरोप करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडेंवर केला आहे.

धनंजय मुंडे मला माझ्या मुलांशी भेटू देत नाहीयेत. 24 जानेवारी रोजी मुलांची भेट घेण्यासाठी बँगल्यावर जाताच धनंजय मुंडे यांनी पोलिसांना बोलावून मला हकलून लावलं, असं करूणा शर्मा यांनी सांगितलं आहे.

मला पोलिसांनी सहकार्य न केल्यास 20 फेब्रूवारीपासून मी आमरण उपोषण करेन, असा इशारा देखील करूणा शर्मा यांनी दिला आहे.

थोडक्यात बातम्या-

‘या’ तारखेपासून महाविद्यालये पुन्हा सुरु होणार; उदय सामंत यांची महत्त्वपूर्ण घोषणा

शरजील उस्मानी कुठेही असला तरी त्याला शोधून अटक करू- अनिल देशमुख

गावकऱ्यांनी मोठ्या आनंदाने शिक्षकाला दिला निरोप, व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल

ऑनलाईन उपस्थिती ग्राह्य धरुन ‘या’ विद्यार्थ्यांना मिळणार शिष्यवृत्ती

“मोदी सरकारने हे बजेट सामान्यांसाठी नाही तर उद्योगपतींसाठी आणलं”

.

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More