बीड | रेणू शर्मा नावाच्या महिलेनं राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंवर बलात्काराचा आरोप केला होता. त्यानंतर तिनं बलात्काराची केस मागे घेतली. यावर धनंजय मुंडेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
एखाद्या भगवंताचा प्रसाद असतो, तसे तुमच्या सर्वांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत. मी शब्दात आभार मानू शकत नाही, असं धनंजय मुंडे म्हणाले. ते बीडमध्ये माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना धनंजय मुंडे भावुक झाल्याचं पहायला मिळालं.
आजपर्यंत अनेक संकटाला सामोरे गेलो. सामान्य माणसाच्या मनामध्ये स्थान निर्माण करून आज इथपर्यंत पोहोचलो. जीवनामध्ये मी कोणाचेही मन दुखवून स्थान निर्माण केले नाही. मन जिंकून मी स्थान निर्माण केलंय, असं धनंजय मुंडेंनी सांगितलं.
पल्या उपकाराची परतफेड माझ्या अंगावरील कातड्याची जोडे करून जरी आपल्याला घातली तरीही ती फिटू शकत नाही, असं धनंजय मुंडे म्हणालेत.
थोडक्यात बातम्या-
हिंसेनं कोणत्याही समस्या सुटू शकत नाही- राहुल गांधी
धक्कादायक! आंदोलनकर्त्यांचा पोलिसांवर तलवारी घेऊन हल्ल्याचा प्रयत्न, एक पोलीस जखमी
“विजय वडेट्टीवार यांच्या तोंडाला काळे फासणाऱ्याला मराठा भूषण पुरस्कार देेऊ”
दिल्लीत शेतकरी आक्रमक, शेतकरी आंदोलक लाल किल्ल्यावर धडकले!
“मोदी सरकारकडून घटनेवर हल्ला, राज्यघटनेचं संरक्षण करावं लागेल”