बीड | बीडमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीचे समर्थक आणि धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांनी विजय मिळवला आहे. त्यामुळे मुडेंवर झालेल्या आरोपांमुळे मतांवर कोणताह परिणाम झाला नाही हे स्पष्ट झालं आहे.
परळी तालुक्यातील 8 पैकी 6 ग्रामपंचायतींवर धनंजय मुंडे यांच्या गटानं विजय मिळवला. परळीमध्ये धनंजय मुंडे यांच्या गटानं पुन्हा एकदा वर्चस्व दाखवून दिलं आहे. भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
परळी तालुक्यातील 8 पैकी वंजारवाडी, रेवली, सरफराजपूर, मोहा, गडदेवाडी, वंजारवाडी , लाडझरी ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादीनं विजय मिळवला आहे. परळी तालुक्यातील रेवली आणि वंजारवाडी ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली होती. या दोन्ही ग्रामपंचायती राष्ट्रवादीकडे गेल्या होत्या.
दरम्यान, भोपळा ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपच्या गटानं विजय मिळवला आहे.
थोडक्यात बातम्या-
कलाकार म्हणून काम करताना मला ‘या’ गोष्टीची भीती वाटते- कंगणा राणावत
भादली ग्रामपंचायतीचा ऐतिहासिक निकाल, तृतीयपंथी असलेल्या अंजली पाटील विजयी
“संजय राऊतांची राज्याबाहेर जाऊन लाज घालवायची सवय जात नाही”