Top News औरंगाबाद महाराष्ट्र

शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर केल्यावर धनंजय मुंडे म्हणाले…

Loading...

बीड | महाविकासआघाडी सरकारच्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या 15 हजार लाभार्थी शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर झाली. यावर मंत्री धनंजय मुंडे यांनी आपली प्रतिक्रीया दिली आहे.

शेतकरी कर्जमुक्ती योजनेची पहिली यादी जाहीर झाली. एप्रिल अखेरपर्यंत टप्प्याटप्प्यानं याद्या जाहीर होऊन सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळेल. जिल्हा पातळीवर अंमलबजावणीचं काम सुरू झालं आहे. बळीचं राज्य आलं, असं म्हणत धनंजय मुंडेंनी योजनेचे स्वागत केलं.

जाहीर करण्यात आलेल्या पहिल्या यादीत बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील 700 शेतकऱ्यांचे नाव समाविष्ट आहे. त्यामुळे कायम दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या आमच्या भागातील शेतकऱ्याला या कर्जमाफीमुळे नक्कीच दिलासा मिळेल असा विश्वास धनंजय मुंडेंनी व्यक्त केला.

दरम्यान,  महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची पहिली यादी जाहीर झाली आहे. पहिल्या यादीत 68 गावातील 15 हजार 358 लाभार्थ्यांची नावं आहेत.

 

Loading...

ट्रेंडिंग बातम्या-

“…म्हणून ट्रम्प यांची मी निंदा करतो; त्यांनी त्वरीत माफी मागावी”

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कर्जमाफीचा दुसरा टप्पाही लवकरच जाहीर करतील- बच्चू कडू

महत्वाच्या बातम्या-

Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या