धनगर आरक्षणासाठी भाजप खासदार रस्त्यावर; जाळला महायुतीचा वचननामा!

मुंबई | राज्यात आता धनगर समाज आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झाला आहे. राज्यात ठिकठिकाणी धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी महायुतीचा 2014 च्या लोकसभा निवडणुकीचा वचननामा जाळला आहे.

शासनाकडून धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये आरक्षण देण्यात यावं या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं. मुलुंड विभागात झालेल्या आंदोलनाचं नेतृत्व भाजप खासदार विकास महात्मे यांनी केलं.

2014 च्या निवडणुकीपूर्वी सत्ता आल्यावर धनगर समाजाला आरक्षण देऊ, असं आश्वासन महायुतीने दिलं होतं ते पूर्ण केले नाही, अशी टीका खासदार विकास महात्मे यांनी केली.

दरम्यान, मी भाजपचा खासदार असलो तरी आधी मी धनगर आहे यासाठी वचननामा होळी आंदोलनात मी आहे, असं खासदार विकास महात्मे म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-माजलगावच्या वादग्रस्त DYSP भाग्यश्री नवटकेंवर अखेर कारवाई

-खासदार सुप्रिया सुळे यांना ‘श्रेष्ठ सांसद’ पुरस्कार जाहीर

-समोरच्या उमेदवाराला पराभूत करण्यासाठी चक्क घुबडांचा वापर!

-चक्क पंतप्रधान आवास योजनेंतर्गत बांधलेलं घरच गेलं चोरीला!

-शरद पवार आणि नारायण राणेंच्या भेटीवर चंद्रकांत पाटील म्हणतात…