औरंगाबाद | धनगर समाज गरीब आणि भोळा आहे. त्यामुळे आरक्षण मिळवून देतो, असं सांगून काही लोकांनी त्यांचा गैरफायदा घेतला आहे, असं राष्ट्रवादीचे आमदार रामराव वडकुते यांनी म्हटलं आहे. ते ‘सरकारनामा’शी बोलत होते.
‘माझ्या पाठीशी एवढा समाज आहे’ असे सांगत अनेकांनी आपली झोळी भरून घेतली आणि समाजाला उपेक्षित ठेवले, असा आरोप वडकुते यांनी यावेळी केला.
समाजाच्या लोकसंख्येच्या आधारावर राजकीय आरक्षण द्यावे लागेल या भितीपोटीच आतापर्यंतच्या कुठल्याच सरकारने धनगर समाजाला आरक्षण मिळू दिले नाही, असंही त्यांनी यावेळी म्हटलं.
महत्त्वाच्या बातम्या-
-नाव बदललं, आता संपूर्ण अयोध्येत मांस-मटण आणि दारूवर बंदी आणण्याची तयारी
-स्टार क्रिकेटपटू मिताली राजनं दिले क्रिकेटमधून निवृत्त होण्याचे संकेत…
-राम जन्मभूमी खटल्याची सुनावणी लवकर घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
-राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांची माफी मागावी; संजय निरुपम यांची मागणी
-…म्हणून मुख्यमंत्र्यांच्या बैठकीतून तडकाफडकी बाहेर पडले धनंजय मुंडे
Comments are closed.