बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“संजय राऊतसारख्या भाटाची धनगर समाजाला आवश्यकता नाही”

मुंबई | सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींचं आरक्षण रद्द केल्यापासून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. विरोधी पक्षनेते आणि सत्ताधारी पक्षनेते यांच्यामध्ये  आरक्षणाच्या मुद्यावरून सतत आरोप-प्रत्यारोपांची खेळी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच धनगर समाजाचे नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

यासंदर्भात गोपीचंद पडळकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरू एक ट्विट केलं आहे. त्यामध्ये त्यांनी राऊतांसारख्या भाटाची धनगर समाजाला आवश्यकता नसल्याचं म्हणत संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. संजय राऊत खातो सेनेचं आणि जागतो पवारांना, असं म्हणत पडळकरांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार टीकाही पडळकरांनी केलं आहे.

तसेच धनगर समाजाला जे एक हजार कोटींचं बजेट मंजूर केलं होतं. ते देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. संजय राऊताच्या मालकानं त्यातला एकही रुपया अद्याप दिला नसल्याचं गोपीचंद पडळकर यांनी सांगितलं आहे.

त्याचबरोबर ओबीसी समाजाकरता फडणवीसांनी 23 जीआर काढले. हे संजय राऊतांना माहिती नाही. त्या 23 जीआरपैकी एकाही जीआरची अंमलबजावणी या सरकारने केली नाही, त्याबद्दल मी सरकारचा जाहीर निषेध करतो, असंही पडळकर यांंनी म्हटलं.


थोडक्यात बातम्या-

डेल्टा प्लस व्हेरिएंटची चिंता करू नका; CSIR शास्त्रज्ञांनी केला मोठा खुलासा, म्हणतात…

‘तुझ्यात जीव रंगला’ मधील वहिणीसाहेबांच्या बाळाचा चेहरा अन् नाव आलं समोर

सकारात्मक बातमी! देशातील नव्या कोरोनाबाधितांची संख्या 50 हजारांच्या खाली, पाहा आकडेवारी

“20 टक्के लसीकरण झालेल्या देशात कोरोनाची तिसरी लाट नाहीच”

डेल्टा प्लस व्हेरिएंटचा सर्वाधिक धोका महाराष्ट्रालाच का?; तज्ज्ञांनी दिली महत्वाची माहिती

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More