मेगाभरतीला धनगरांचा विरोध; आधी धनगरांना एसटी प्रवर्गाचे दाखले द्या!

मुंबई | मराठा आरक्षण मंजूर होईपर्यंत मेघाभरती स्थगित करण्यात आली होती. आरक्षण दिल्यानंतर राज्य शासनाने मेघा भरती जाहीर केली. मात्र त्यावर आता धनगर समाजाने स्थगिती देण्याची मागणी केली आहे.

आधी धनगर समाजाला एसटी प्रवर्गाचे दाखले द्या, त्यानंतर कोणत्याही प्रकारची भरती घ्या, असा इशारा यशवंत सेनेनं राज्य सरकारला दिला आहे.

धनगर समाजाला एसटी प्रवर्गाचे दाखले मिळाल्यास सुमारे दीड कोटी समाज बांधवांना त्याचा फायदा होण्याची शक्यता आहे, असं मत यशवंत सेनेचे अध्यक्ष माधव गडदे यांनी व्यक्त केलं आहे.

दरम्यान, मेगाभरतीला स्थगिती द्या, नाहीतर जिल्हानिहाय यशवंत सेनेकडून होणाऱ्या विरोधाला सरकार जबाबदार असेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

महत्वाच्या बातम्या-

-…याचाच अर्थ मनोहर भिडेच सरकार चालवतात- धनंजय मुंडे

-भाजपला जोरदार झटका; हिरे पिता-पुत्राची घरवापसी

-भाजपमुळे संविधानाला मोठा धोका निर्माण झाला आहे- अशोक चव्हाण

-अमित शहांना कोलकाता हायकोर्टाचा दणका!

-दुष्काळग्रस्तांना मदत करण्याबाबत राज्य आणि केंद्र सरकार गंभीर नाही- धनंजय मुंडे