महाराष्ट्र मुंबई

‘बाजी पलटने में देर नहीं लगती…’- धनंजय मुंडे

मुंबई | सत्तेचा गैरवापर करून विरोधी पक्षांच्या नेत्यांना फोडण्याची एक अनिष्ठ राजकीय परंपरा महाराष्ट्रात भाजपा-सेनेच्या सरकारने सुरू केली आहे. सरकार येत असतात, जात असतात… बाजी पलटने में देर नहीं लगती, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.

आघाडीचं सरकार आल्यास या भ्रष्ट नेत्यांवर कारवाई करण्यासाठी आम्ही सत्तेचा गैरवापर करणार नाही. परिस्थिती अशी येईल की भ्रष्ट नेत्यांना एक दिवसही स्वपक्षात राहणे अवघड होऊन जाईल, असंही धनंजय मुंडे म्हणाले.

राष्ट्रवादी पक्ष हा पुरोगाम्यांचा पक्ष आहे. तो कुणी कुठे गेले म्हणून संपणार नाही. याउलट तो आणखी पाय रोवून उभा राहिल, असंही मुंडे म्हणाले.

दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादीचे नेते पक्षाला सोडचिठ्ठी देऊन सत्ताधारी भाजप-शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदारासह 52 नगरसेवक भाजपमध्ये जाणार??

-“काँग्रेस-राष्ट्रवादीचे 50 आमदार भाजपच्या संपर्कात”

-“लोकसभा तो सिर्फ झाँकी थी, विधानसभा की पुरी पिक्चर अभी बाकी हैं”

-शरद पवारांच्या टीकेला आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर; म्हणतात…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या