बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

उपराष्ट्रपतीपदासाठी भाजपकडून जगदीप धनगड यांना उमेदवारी, शेतकरी पुत्राबद्दल जाणून घ्या सर्वकाही

नवी दिल्ली | भारताचे विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ramnath Kovind) यांचा कार्यकाळ संपत आहे. त्यामुळे येत्या 18 जुलैै रोजी राष्ट्राच्या नवीन राष्ट्रपतींची निवडणूक होणार आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून (NDA) म्हणजे केंद्रातील सत्ताधारी भाजप पक्षाकडून दौपदी मुर्मु (Draupadi Murmu) या रिंगणात आहेत. तर देशतील सर्व विरोधी पक्षांचे संयुक्त उमेदवार म्हणून यशवंत सिन्हा (Yashwant Sinha) यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

आता राष्ट्रपतींच्या (President of India) निवडणुकीसोबतच उपराष्ट्रपतींच्या (Vice President of India) निवडणुकीची देखील तयारी सुरु झाली आहे. भारतीय लोकशाही आघाडी तर्फे पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनकड (Jagdeep Dhankad) यांच्या नावाची घोषणा केली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamta Banerjee) आणि केंद्र सरकार भाजप यांचे राजकीय वैर जगजाहीर आहे. त्यामुळे आता त्यांचे हाडवैरी धनकड यांनाच राष्ट्रपतीपदाची उमेदवारी दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

जगदीप धनकड यांचा जन्म राजस्थानमध्ये झाला. त्यांनी चित्तोडगड येथे प्राथमिक तर जयपूरमध्ये पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. त्यांनी वकिलीचे देखील शिक्षण घेतले असून त्यांनी काही काळ वकिली देखील केली. 1989 ते 1991 या काळात ते जनता दलाकडून झुंझूनू मतदारसंघातून लोकसभेवर खासदार होते. त्यांनी काही काळ काँग्रेस पक्षाबरोबर देखील काम केले आहे. 2003 साली त्यांनी भाजप पक्षात प्रवेश केला आणि त्यांना पक्षाने 2019 साली प. बंगालचे राज्यपाल नियुक्त केले.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (J. P. Nadda) यांनी धनकड यांना उमेदवारी देल्याची घोषणा केली. यानंतर पंतप्रधान मोदींनी धनकड यांच्या उमेदवारीबद्दल आनंद व्यक्त केला. नरेंद्र मोदींनी धनकड यांना शेतकरी पुत्र संबोधले आहे.

थोडक्यात बातम्या –

‘राज्यात हे काय सुरू आहे?’; संजय राऊतांचा थेट राज्यपालांना प्रश्न

“शिंदे यांच्याबद्दल आदरच, पण आमच्या मनातील मुख्यमंत्री तुम्हीच”

डायबिटीस असणाऱ्या पेशंटसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी!

सुशांतचं आयुष्य बरबाद केलं म्हणणाऱ्या सुशांतच्या बहिणीला रियाचं प्रत्युत्तर, म्हणाली…

बंडखोर आमदार संतोष बांगर म्हणाले ‘गद्दार म्हणणाऱ्यांच्या कानाखाली आवाज काढा’

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More