‘धनुदादा’ ही हाक आता ऐकायला मिळत नाही, धनंजय मुंडेंचे भावूक वक्तव्य

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी आपले काका गोपीनाथ मुंडे आणि बहीण कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे यांच्याविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या. ‘धनुदादा’ ही हाक आता ऐकायला मिळत नाही, असं म्हणत त्यांनी आपलं भावूक मत व्यक्त केलं.

पंकजा मुंडे या राजकारणात येण्याआधी माझे आणि त्यांचे जे नाते होते, ते मला आवडते. पण नंतर जे झाले ते व्हायला नको होते. ‘एबीपी माझा’च्या एका कार्यक्रमात धनंजय मुंडे बोलत होते. 

आमच्या नात्यात आता अंतर पडले आहे. आता बहीण-भावाचा संबंधही राहिलेला नाही, असं ते यावेळी म्हणाले.

दरम्यान, काकांबरोबरचे (गोपीनाथ मुंडे) नाते मी कधीच विसरु शकत नाही. पुढच्या जन्मीही मला तेच काका लाभावेत, असंही धनंजय मुंडे यावेळी म्हणाले. 

महत्वाच्या बातम्या-

-डाॅ. अमोल कोल्हे यांना दिलासा, ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिका सुरूच राहणार

-“अजून पाच ते सहा दिग्गज नेते आणि त्यांची मुलं भाजपच्या वाटेवर”

-महाराष्ट्रात प्रितम मुंडे आणि पूनम महाजनांचं नाव निश्चित?

-राज ठाकरेंनी कुठेही एक जागा लढावी आणि डिपॉझिट वाचवून दाखवावं- विनोद तावडे

-कतरिनाला सलमान खानने 65 लाखांची कार गिफ्ट केल्याची चर्चा!