Dharashiv | मोबाईल हा मनुष्याचा जीव की प्राण आहे. सेल्फी घेताना नवविवाहित तरूणी किल्ल्यावरून पडली असल्याची माहिती समोर आली. अन्न, वस्त्र, निवाऱ्याप्रमाणे आता मोबईल देखील मुलभूत गरज झाली आहे. मात्र मोबाईलचा वापर कधी? कुठे? कसा केला जाईल? याबाबतचे प्रश्न उपस्थित होताना दिसतात. अशातच धाराशिव जिल्ह्यातील एका किल्ल्यावर एक धक्कादायक घटना घडली आहे. (Dharashiv)
धाराशिव (Dharashiv) येथील भुईकोट किल्ल्यात अशीच एक दुर्घटना घडली आहे. सेल्फी घेण्याच्या नादात दहा दिवसांपूर्वी लग्न झालेल्या नवविवाहित तरूणीचा मृत्यु झाला आहे. निलोफर अमीर शेख असे त्या तरुणीचे नाव आहे.
धाराशिव (Dharashiv) जिल्ह्यात नळदुर्ग भुईकोट किल्ला हा सर्वात मोठा किल्ला आहे. या किल्ल्याची तटबंदी जवळजवळ 3 किमी. लांब पसरलेली आहे. या तटबंदीत 114 बुरूज आहेत. यामुळे हा किल्ला पाहण्यासाठी राज्यभरातून पर्यटक येत असतात.
किल्ल्याच्या बुरूजावरून तरूणीचा सेल्फी घेताना मृत्यु
निलोफर अमीर शेख या तरूणीचे अवघ्या दहा दिवसांआधी विवाह झाला होता. त्यानंतर ती पतीसोबत फिरण्यासाठी आली. नळदुर्ग भुईकोट किल्ल्यात उपळाई बुरूजवरून सेल्फी घेताना मोह आवरला नाही. तिचा तोल सुटला आणि तरूणी पडली. त्यातच तिचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. (Dharashiv)
दहा दिवसांपूर्वीच लग्न झालं आणि…
नवीन संसाराची स्वप्न रंगवणाऱ्या 22 वर्षीय निलोफर अमीर शेख हिचे दहा दिवसांपूर्वीच लग्न झालं होतं. ती तुळजापूर तालुक्यातील हंगरगा गावात राहत होती. ती किल्ल्यावरून पडल्याची घटना घडली आहे. तिला नळदुर्ग येथील एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यु झाल्याची माहिती समोर आली.
किल्ल्यावर अनेक पर्यटक येत असतात. अशा ठिकाणी डोंगर दर्या, नदी नाले तसेच धबधबे देखील असतात. त्यावेळी सेल्फी काढण्यासाठी अनेक लोकं त्या ठिकाणी जमलेली दिसत असतात. यावेळी सेल्फी घेत असताना अनेकांना आपला तोल सावरता येत नाही आणि असे अपघात होण्याची शक्यता असते.
News Title Dharashiv In Naldurg Fort At Newly Married Girl Dies During Take Selfie
महत्त्वाच्या बातम्या
गुरू रंधावा करतोय शहनाज गिलला डेट, म्हणाला “मला खूप छान वाटतं…”
अग्रवाल कुटुंबामुळे माझ्या मुलाने… तक्रारदार पित्याच्या आरोपांनी पुण्यात पुन्हा खळबळ
मुनव्वर फारुकीने दुसऱ्यांदा उरकलं लग्न?, ‘त्या’ फोटोमुळे चर्चेला उधाण
सुनील टिंगरेंच्या अडचणी वाढल्या, डॅाक्टरच्या प्रकरणात पुन्हा आलं नाव
उन्हाळ्यात चमचमीत खाण्यापेक्षा ‘हे’ पदार्थ खा; मिळतील आश्चर्यकारक फायदे