धाराशिवमध्ये ठाकरे गटाचा धमाका; ओमराजे निंबाळकर विजयी

Dharashiv Lok Sabha | महाविकास आघाडीकडून धाराशिवमध्ये शिवसेनेचे विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांना तिकीट देण्यात आलं. तर, महायुतीच्या उमेदवार बनून अर्चना पाटील मैदानात उतरल्या. येथे ओमराजे निंबाळकर यांनी दणदणीत विजय मिळवला आहे.

ओमराजे निंबाळकर विजयी

चौथ्या फेरीअखेर ओमराजे निंबाळकर यांनी 53,917 मतांची आघाडी घेतली होती. विशेष म्हणजे पहिल्या फेरीपासूनच ओमराजे निंबाळकर यांनी आघाडी घेतल्याचं दिसून आला. तब्बल एक लाखांच्या फरकाने निंबाळकर यांनी अर्चना पाटील यांचा पराभव केला.

धाराशिव लोकसभा मतदारसंघात अर्चना पाटील यांच्यासह पाटील परिवाराला ओमराजे निंबाळकर यांनी जोरदार धक्का दिला आहे. ओमराजे निंबाळकर यांच्या विजयाचे बॅनर (Dharashiv Lok Sabha ) देखील येथे झळकले आहेत.

धाराशिवमध्ये मशालचा विजय

धाराशिव येथे महायुतीने जोरदार प्रचार केला होता. त्यामुळे ही जागा महायुतीसाठी महत्वाची मानली जात होती. तर, ओमराजे निंबाळकर यांनी खूपदा ‘मी खासदार होणार आणि दिल्लीला जाणार’, असा विश्वास व्यक्त केला होता. या विजयामुळे (Dharashiv Lok Sabha )महायुतीला मोठा धक्का बसला आहे.

News Title- Dharashiv Lok Sabha Omraje Nimbalkar won

महत्वाच्या बातम्या-

उदयनराजे भोसलेंना रडू कोसळलं, कार्यकर्त्यांचा मोठा जल्लोष

कोल्हापूरमध्ये मान आणि मतही गादीलाच! शाहू महाराजांचा दणदणीत विजय

मोदींमुळेच भाजप खड्ड्यात गेला!, भाजप नेत्याच्या वक्तव्याने मोठी खळबळ

मोठी बातमी! अमरावतीत नवनीत राणांचा पराभव

बारामती शरद पवारांचीच! लेकीनं गड राखला, अजित पवार आता मिशा काढणार?