Dharashiv Lok Sabha Result | महाविकास आघाडीकडून धाराशिवमध्ये शिवसेनेचे विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांना तिकीट देण्यात आलं.तर, महायुतीच्या उमेदवार बनून अर्चना पाटील मैदानात उतरल्या. येथे सध्या ओमराजे निंबाळकर आघाडीवर आहेत.
चौथ्या फेरीअखेर ओमराजे निंबाळकर यांनी 53,917 मतांची आघाडी घेतली आहे. विशेष म्हणजे पहिल्या फेरीपासूनच ओमराजे निंबाळकर यांनी आघाडी घेतल्याचं दिसून येत आहे. तर, अर्चना पाटील पिछाडीवर आहेत.
ओमराजे निंबाळकर आघाडीवर
धाराशिव लोकसभा मतदारसंघात अर्चना पाटील यांच्यासह पाटील परिवाराला ओमराजे निंबाळकर यांनी जोरदार धक्का दिला आहे. त्यांची आता विज्याकडे वाटचाल सुरू झाली आहे. ओमराजे निंबाळकरांनी जवळपास दीड लाखांची लीड घेतली आहे.सध्या ओमराजे निंबाळकर यांच्या विजयाची औपचारीकता बाकी आहे.
धाराशिवमध्ये मशाल विजयाच्या पथ्यावर
धाराशिव येथे महायुतीने जोरदार प्रचार केला होता. त्यामुळे ही जागा महायुतीसाठी महत्वाची मानली जात होती. तर, ओमराजे निंबाळकर यांनी खूपदा ‘मी खासदार होणार आणि दिल्लीला जाणार’, असा विश्वास व्यक्त केला होता. सध्या आलेल्या आकडेवारीनुसार ओमराजे निंबाळकर आघाडीवर असल्याचं चित्र आहे.
News Title- Dharashiv Lok Sabha Result
महत्वाच्या बातम्या-
महाविकास आघाडीने विजयाचं खातं उघडलं; ‘या’ नेत्याने मारली बाजी
काँग्रेस सत्तेत येणार?, भाजपविरोधात टाकला आतापर्यंतचा सर्वात मोठा डाव
दिंडोरीत शरद पवारांच्या उमेदवाराला मोठा धोका, अपक्ष भगरेंना मोठं मतदान
वंचित मतांपासून सुद्धा वंचित!, पुणे, बीड, धाराशिव, परभणी आणि अकोल्यात फक्त एवढी मतं
सर्वात मोठी बातमी! सेक्स स्कँन्डल प्रकरणातील आरोपी प्रज्वल रेवन्नाचा पराभव