Dharashiv school | धाराशिव (Dharashiv) जिल्ह्यातील कळंब येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत (PM Poshan Shakti Nirman Yojana) दिल्या जाणाऱ्या मिलेट न्यूट्रेटिव्ह बारमध्ये अळ्या आणि किडे आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. पालकांनी या प्रकाराची तक्रार केल्यानंतर चॉकलेट बारचे वाटप तातडीने थांबवण्यात आले आहे. (Dharashiv school)
विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ?
प्रधानमंत्री पोषण शक्ती योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना ज्वारी आणि बाजरीपासून तयार करण्यात आलेले मिलेट चॉकलेट बार पुरवले जातात. मात्र, या चॉकलेटमध्ये अळ्या आणि किडे आढळून आल्याने या योजनेच्या अंमलबजावणीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ करत असल्याचा आरोप संतप्त पालकांनी केला आहे.
शाळेच्या मुख्याध्यापकांची तत्काळ कारवाई
या घटनेची गंभीर दखल घेत शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र बिक्कड (Rajendra Bikkad) यांनी तात्काळ चॉकलेट वाटप बंद केले. तसेच संपूर्ण प्रकाराचा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
पोषण आहाराच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
सरकारी शाळांमध्ये पुरवठा होणाऱ्या पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबत यापूर्वीही अनेकवेळा तक्रारी झाल्या आहेत. मात्र, आता थेट अळ्या आणि किडे आढळल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर संशय निर्माण झाला आहे. या घटनेमुळे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये दिल्या जाणाऱ्या अन्नाच्या गुणवत्तेवर मोठे प्रश्नचिन्ह लागले आहे. (Dharashiv school)
Title : Dharashiv school Insect-Infested Millet Chocolate Bars Distributed