Top News कोरोना मुंबई

धारावी कोरोनामुक्तीचं श्रेय सरकारचं नसून RSSचं, स्वयंसेवकांनी जीव धोक्यात घालून काम केलं- चंद्रकांत पाटील

मुंबई | धारावीत कोरोना नियंत्रण मिळवण्यात यश आल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेनं धारावी पॅटर्नचं कौतुक केलं. त्यानंतर धारावीतील करोना प्रसार रोखण्यावरून आता श्रेयवादाची लढाई सुरू झालीये. यावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केलं असून, “सगळं श्रेय सरकारं घेण्याचं कारण नाही. स्वयंसेवकांनी जीव धोक्यात घालून स्क्रिनिंग केलं,” असल्याचं म्हटलंय.

“ज्या गोष्टी कौतुकाच्या आहेत, त्याचं कौतुक केलं पाहिजे. पण चुकीच्या गोष्टींवर टीका करायची नाही का? भारतातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखली जाणारी धारावी कोरोनाचा केंद्र बिंदू ठरली. पण धारावीने कोरोनावर मात केली आहे. पण यांचं श्रेय सरकारचं नसून, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी जीव धोक्यात घालून केलेल्या स्क्रिनिंगचं आहे. करोना विरुद्धच्या लढाईत सरकारनं केवळ भ्रष्टाचार केला,” असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला.

“चौदाव्या वित्त आयोगातील शिल्लक निधीचं व्याज ग्राहकास विभागाकडून जमा करण्याचा काढलेला फतवा चुकीचा आहे. वित्त आयोगाचे पैसे केंद्राने ग्रामपंचायतींना दिले ते राज्य सरकार कसे काय वापरु शकतं,” असा सवालही चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला.

धारावीतील कोरोना प्रसार रोखण्यात यश आलंय. धारावीत राबवण्यात आलेल्या उपाययोजनांची दखल जागतिक संघटनेनंही घेतली आहे. मात्र यावर काल नितेश राणे यांनीही याचं श्रेय आरएसएस आणि स्वयंसेवी संस्थाना देण्यात यावं असं म्हटलं होतं. त्यानंतर आता चंद्रकांत पाटील यांचं देखील हेच म्हणणं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

रूग्णाची संख्या लपवण्यासाठी कमी चाचण्या, पण लक्षात ठेवा…., फडणवीसांचा सरकारला इशारा

‘नया है वह…’ म्हणत फडणवीसांनी उडवली आदित्य ठाकरेंची खिल्ली!

महाराष्ट्रातल्या या शहरात लॉकडाऊन वाढवला, आयुक्तांनी काढले आदेश

धक्कादायक! ‘One Plus मोबाईल कंपनीनं कपड्यांच्या आरपार पाहता येणारा कॅमेरा बनवला, पण आता…

अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण, रेखा यांचा बंगला सील!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या