Top News कोरोना महाराष्ट्र

“RSS आणि अन्य संस्थांमुळे धारावीत कोरोनावर नियंत्रण, सरकारला पूर्ण श्रेय देऊ नये”

मुंबई | धारावीसारख्या भागातील कोरोना रूग्णांच्या संख्येवर नियंत्रण मिळवल्याची दखल जागतिक आरोग्य संघटनेने घेतलीये. मात्र धारावीतील कोरोना रुग्णसंख्या ही महाराष्ट्र सरकारमुळे नाही तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि अन्य संस्थांच्या कामामुळे नियंत्रणात आली असल्याचा दावा भाजप आमदार नितेश राणे यांनी केला आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने राज्य सरकारला याचं पूर्ण श्रेय देऊ नये, असंही नितेश राणे म्हणालेत.

नितेश राणेंनी ट्विट करत म्हटलंय, “आरएसएस आणि इतर संघटनांनी धारावीत दिवसरात्र मेहनत केली शिवाय तिथल्या लोकांची जनजागृती केली. धारावी कोरोना रुग्ण घटण्याचं एकमेव कारण म्हणजे RSS आणि अन्य संस्था आहेत. त्यामुळे सर्व श्रेय सरकारला दिल्यास मेहनत केलेल्या खऱ्या संस्थावर अन्याय होईल. जागतिक आरोग्य संघटनेने याचं श्रेय महाराष्ट्र सरकारला देण्यापेक्षा खरं ज्यांनी मेहनत केली आहे त्यांना द्यावं.”

जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस अडॅनॉम गेब्रेयसिस यांनी “धारावी एक उदाहरण आहे की ज्यामध्ये कोरोनाने शिरकाव केला आणि सरकारने त्यावर नियंत्रण मिळवले” असं म्हणत कौतुक केलं आहे.

मुंबईतील धारावी झोपडपट्टी कोरोनाचा हॉटस्पॉट ठरली होती. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव झाला होता. त्यामुळे दिवसाला मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण सापडत होते. मात्र आता या ठिकाणच्या कोरोना संक्रमणावर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे.

शरद पवार मुलाखत स्पेशल बातम्या-

…तर भाजपच्या 40-50 जागाच निवडून आल्या असत्या; शरद पवारांनी सांगितलं ‘हे’ कारण

बाळासाहेब आणि उद्धव ठाकरे यांच्यात काय फरक आहे?, शरद पवारांनी ठेवलं अचूक बोट!

सरकारस्थापनेबाबत भाजपशी चर्चा झाली होती का?, शरद पवारांचा गौप्यस्फोट म्हणाले…

तुम्ही या सरकारचे हेडमास्तर आहात की रिमोट कंट्रोल?; शरद पवारांचं आश्चर्यकारक उत्तर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या