शेतकरी धर्मा पाटील यांचा सरकारसोबतचा संघर्ष अखेर संपला

मुंबई | सरकार दरबारी न्याय मिळवण्यासाठी खस्ता खाणाऱ्या आणि हतबलतेतून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या 80 वर्षीय धर्मा पाटील यांचं अखेर निधन झालंय. जेजे रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 

धुळ्यातील शेतकरी धर्मा पाटील यांची 5 एकर जमीन सरकारनं औष्णिक विद्युत केंद्रासाठी संपादित केली होती. मात्र योग्य मोबदला न मिळाल्यानं त्यांना मंत्रालयाच्या पायऱ्या झिजवाव्या लागल्या होत्या. 

सरकारदरबारी काहीच होत नसल्यानं त्यांनी विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबियांनी धर्मा पाटील यांचं अवयवदान करण्याचा निर्णय घेतला आहे. 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा