बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“आमच्या बापाची बदनामी होत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही”

कोल्हापूर | राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावरील टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. शरद पवार यांना सतत बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, असं जितेंद्र आव्हाडांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्रमध्ये वणवा पेटवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. धर्माची गोळी दिली की, लोक झोपून राहतात हे त्यांना माहिती आहे. महात्मा गांधी यांना ज्याप्रमाणे बदनाम केले गेले तसाच प्रयत्न शरद पवार यांच्या संदर्भात होत आहे, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.

महाविकास आघाडी सरकार बनविण्यासाठी शरद पवारांचे मोठे योगदान आहे. कोणी एकाने ठरवले म्हणून हे सरकार झालेलं नाही. हे सरकार स्थापन करण्यासाठी इतरांनी मदत केलेली नाही. जर आमच्या बापाची बदनामी होत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही, असंही जितेंद्र आव्हाडांनी म्हटलं आहे.

दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनी बोलताना आर्यन खानच्या सुटकेविषयीही वक्तव्य केलं. चार महिने जेलमध्ये जाऊन आल्यावर बालमनावर काय परिणाम होतो याचा विचार आपल्या घरातील मुलांकडे पाहून केला पाहिजे, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.

थोडक्यात बातम्या- 

मोठी बातमी! राणा दाम्पत्यांवर गुन्हा दाखल, ‘हे’ कारण आलं समोर

‘भारतात श्रीलंकेसारखी परिस्थिती निर्माण झाली’; नाना पटोलेंचं भाजपवर टीकास्त्र

सुप्रिया सुळेंविषयी केलेल्या वक्तव्यावर चंद्रकांत पाटलांची माफी, म्हणाले….

“समीर वानखेडे केंद्रीय तपास यंत्रणेचा पोपट, या पोपटावर कुठलीही कारवाई होणार नाही”

चंद्रकांत दादांनी चोंबडेपणा करू नये – संजय राऊत

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More