बापू देना थोडा कॅश, पाहा ढिन्चॅक पुजाचं नवं गाणं

मुंबई | बेसूर आवाज आणि सुमार शब्दरचना असूनही यूट्यूबवर लोकप्रिय झालेल्या ढिन्चॅक पुजाचं नवं गाणं आलं आहे. बापू देना थोडा कॅश, असं या गाण्याचं नाव आहे.

काही दिवसांपूर्वी यूट्यूबवरुन एक गाणं वगळता पूजाची सर्व गाणी हटवण्यात आली होती. त्यामुळे ती आणखी प्रसिद्धीझोतात आली होती. कथप्पा सिंग नावाच्या व्यक्तीनं तक्रार केल्यानं ही गाणी हटवण्यात आल्याचं कळतंय.

दरम्यान, पुजाच्या नव्या गाणं फक्त लिरिक्स व्हर्जन आहे, त्यामुळे या गाण्याचं व्हिडिओ व्हर्जनही येऊ शकतं.

पाहा पुजाचं नवं गाणं-

 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या