Loading...

पुणे महापालिकेवर कसब्याचे वर्चस्व; धीरज घाटे सभागृहनेते तर हेमंत रासने स्थायी समिती अध्यक्ष

पुणे | पुणे महापालिकेच्या सभागृह नेतेपदी धीरज घाटे यांची तर स्थायी समितीच्या अध्यक्षपदी नगरसेवक हेमंत रासने यांची निवड करण्यात आली आहे. घाटे आणि रासने यांच्या रूपाने महापालिकेतील दोन्ही महत्वाची पदं कसबा विधानसभा मतदारसंघातच राहणार आहेत.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातून धीरज घाटे, हेमंत, रासने हे दोघेही भाजपच्या उमेदवारीसाठी प्रयत्नशील होते. पण भाजपने मुक्ता टीळक यांना उमेदवारी दिली.

Loading...

हेमंत रासने आणि धीरज घाटे या दोघांना महापालिकेत मोठं पद दिलं जाण्याची शक्यता  होती. स्थायी समितीचं अध्यक्षपद हे पुढील 13 महिन्यांसाठी हेमंत रासने यांच्याकडे असणार आहे.

दरम्यान, सध्याचे सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, स्थायी समितीचे अध्यक्ष सुनील कांबळे आणि पीएमपीचे संचालक सिद्धार्थ शिरोळे यांनी मंगळवारीच आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत.

Loading...

महत्वाच्या बातम्या- 

 

 

Loading...

 

 

 

Loading...