‘हिंदूंच्या घरात दोन मुले असतील तर एकाला…’; धीरेंद्र शास्त्रींचं वक्तव्य चर्चेत
मुंबई | बागेश्वर धाम सरकार म्हणून प्रसिद्ध असलेले धीरेंद्र कृष्ण शास्त्रीचं (Dhirendra Krushna Shastri) एक वक्तव्य सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. हिंदूंच्या घरात दोन मुले असतील तर एका मुलाला रामनवमीच्या मिरवणुकीत पाठवा. जर चार मुले असतील तर दोन मुलांना रामनवमीच्या मिरवणुकीत पाठवा, असं वक्तव्य धीरेंद्र शास्त्री यांनी केलं आहे.
रामलीला मैदानावरील एका कार्यालयाच्या उद्घाटन समारंभाला संबोधित करताना धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी हे वक्तव्य केलं आहे.
लोकांनी किती वेळा आव्हान दिलं. आम्ही प्रत्येक वेळी उत्तर दिलं. अशा प्रकारचं आव्हान देऊन मुलांनी स्वस्तात लोकप्रियता मिळवण्याचा नवा मार्ग शोधला आहे, असं ते म्हणालेत.
दरम्यान, परिस्थिती कशीही असो, सर्व हिंदूंनी एकमेकांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे, असेही धीरेंद्र म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या-
- “उद्धव ठाकरे मला तोतऱ्या म्हणतात, पण या तोतऱ्यावर महाराष्ट्राला अभिमान”
- मोठी बातमी! सतिश कौशिक यांच्या मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट
- Honda ने लाँच केल्या दोन नव्या जबरदस्त बाईक; जाणून घ्या फिचर्स
- सावधान! ‘या’ जिल्ह्यांत अवकाळी पावसाची शक्यता
- आगीतून फुफाट्यात; चारा घोटाळ्यानंतर आता ‘या’ घोटाळ्यात अडकले लालू प्रसाद यादव
Comments are closed.