देशातील सर्वात मोठ्या पुलाचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण

नवी दिल्ली | ब्रम्हापुत्रा नदीवर बांधण्यात आलेल्या देशातील सर्वात मोठ्या ढोला-सदिया पुलाचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. सुरक्षारक्षक आणि सगळा ताफा बाजूला ठेऊन मोदींनी या पुलावर रपेट मारली. यावेळी केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी आणि आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्याशी त्यांनी चर्चा केली.

दरम्यान, सुमारे सव्वा नऊ किलोमीटर लांबीच्या या पुलामुळं आसाम व अरुणाचल प्रदेश या राज्यांतील अंतर १६५ किमीनं कमी होणार आहे.

 

 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या