बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धोनीने दिलेल्या अनेक टीप्स अपयशी ठरतात; ‘या’ क्रिकेटपटूचा खुलासा

नवी दिल्ली | महेंद्रसिंग धोनीने यष्टीमागून दिलेल्या अनेक टीप्स अपयशी ठरतात, असं वक्तव्य क्रिकेटपटू कुलदीप यादव याने केलं आहे. त्याच्या या वक्तव्यावरुन नेटकऱ्यांनी कुलदीपला ट्रोल केलं आहे.

CEAT पुरस्कार वितरण सोहळ्यात फिरकीपटू कुलदीप यादवला पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी धोनीविषयी बोलताना त्याने ही प्रतिक्रिया दिली आहे.

धोनी यष्टीमागून आम्हाला अनेकदा टीप्स देतो. त्याच्या काही टीप्स आमच्या कामाला येतात, मात्र त्याच्या बऱ्याच टीप्स अपयशी ठरतात, असं वक्तव्य त्याने केलं होतं.

दरम्यान, ‘धोनीच्या अनेक टीप्स अपयशी ठरतात’ हे वक्तव्य धोनीच्या चाहत्यांना पचनी पडल्याचं दिसत नाही. त्यामुळे सोशल मीडियातून कुलदीपला ट्रोल केलं जात आहे.

महत्वाच्या बातम्या

-बरं झालं पश्चिम बंगालमुळे भाजपला लोकशाही आठवली- संदिप देशपांडे

-दुष्काळी उपाययोजनांबाबत शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना दुसरे पत्र

-“कोलकात्यातील हिंसाचाराला पश्चिम बंगालमधील सरकार जबाबदार”

-सीआरपीएफ नसते तर मी वाचू शकलो नसतो- अमित शहा

-मोदींच्या सभेस्थळी विकले ‘मोदी पकोडे’; पोलिसांनी केली अटक

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More