खेळ

धोनीच आला मदतीला, केदारला दिलेल्या टीप्समुळे सामन्याला कलाटणी

वेलिंग्टन | भारत विरुद्ध न्यूझीलंड पाचवा आणि अखेरचा सामना सुरु आहे. यात भारत विजयाच्या जवळ असून महेंद्रसिंग धोनीच्या काही टीप्स संघाच्या पुन्हा एकदा कामाला आल्या आहेत.

भारताच्या 253 धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन दमदार फलंदाजी करत होता. त्यामुळे त्याला बाद करणे गरजेच झालं होतं. यावेळी रोहित शर्माने केदार जाधवच्या हाती चेंडू दिला.

केन मोठा फटका मारणार असं महेंद्रसिंग धोणीच्या लक्षात आलं. त्याने केदारला अशा काही टीप्स दिल्या की केनने चेंडू थेट धवनच्या हातात सोपवला. त्यामुळे सामन्याला कलाटणी मिळाल्याचं पाहायला मिळालं.

दरम्यान, शेवटचे वृत्त हाती आले त्यानुसार न्यूझीलंडने 208धावांत 8 खेळाडू गमावले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-उदयनराजेंनी सैन्यातील जवानाला दिली ‘एअर लिफ्ट’

हवं तर माझा जीव घ्या पण माझ्या कोंबडीला सोडा

“अण्णांच्या उपोषणासाठी शुभेच्छा पाठवता का? आम्ही पत्रावर मार्ग काढायचो!”

-अण्णांची प्रकृती ढासळताच सरकारची घाबरगुंडी, गिरीश महाजन निघाले भेटीला

-मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी रॉबर्ट वाड्रांना ईडीसमोर हजर राहण्याचे आदेश

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या