बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

2021 आयपीएलचा अंतिम सामना खेळत धोनीने केलाय हा भीम पराक्रम, जाणून घ्या!

मुंबई | आयपीएल 2021 चा अंतिम सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन्ही संघात होत आहे. भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईचा संघ सध्या खेळत आहे. या सामन्यामुळे धोनीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

आयपीएलमध्ये धोनी 2007 पासून चेन्नई सुपर किंग्ज संघाचं नेतृत्व करत आहे. या सामन्यात खेळताना धोनीने टी-20 प्रकारामध्ये 300 सामन्यांमध्ये कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारली आहे. त्यामुळे धोनीच्या नावावर हा नवीन विक्रम झाला आहे. धोनीने आतापर्यंत 299 सामन्यापैकी 176 सामन्यात संघाला विजय मिळवून दिला आहे. तर 118 सामन्यामध्ये पराभवाचा सामना करावा लागला. तर 3 सामने अनिर्णित राहिले आहेत.

महेंद्र सिंग धोनीनंतर वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू डॅरेन सॅमीने 208 सामन्यात नेतृत्व केलं आहे. तर विराट कोहलीने 185 तर भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर 170 आणि रोहित शर्माने 153 सामन्यामध्ये टी-20 प्रकारामध्ये नेतृत्व केलं आहे.

दरम्यान, आयपीएलमध्ये आता पर्यंत चेन्नई सुपर किंग्जने 3 वेळा आयपीएलचा किताब जिंकला आहे. आज होत असलेल्या कोलकाता विरूद्ध सामना चेन्नई सुपर किंग्जने जिंकला तर चेन्नईचा संघ चौथ्यांदा आयपीएलच्या किताबाचा दावेदार ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या-

“एकाला बाहेर काढा मग, आपोआप देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील”

मुंबईच्या कोरोना आकडेवारीत कमी अधिक प्रमाणात वाढ, जाणून घ्या आजची आकडेवारी

फॅबुलस ड्युपलेसी! अंतिम सामन्यात फाफची 86 धावांची धमाकेदार खेळी, कोलकाताला ‘इतक्या’ धावांचं लक्ष्य

राज्याच्या कोरोना आकडेवारीत चढ-उतार, वाचा आजची ताजी आकडेवारी

“उद्धव ठाकरेंचं आजचं भाषण म्हणजे ‘प्रबोधनकार ठाकरे’ इज बॅक”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More