बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

विराटवर धोनी भारी! चेन्नईचा बंगळुरूवर 6 गडी राखून दणदणीत विजय

मुंबई | आयपीएलच्या 35 वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन्ही संघात खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाचे आजी माजी कर्णधार भिडले होते. त्यात चेन्नई सुपर किंग्जने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर दमदार विजय मिळवला आहे. 6 गडी राखून हा सामना जिंकला आहे. त्याचबरोबर चेन्नईने गुणतालिकेत अव्वल स्थान प्राप्त केलं आहे.

चेन्नईने प्रथम नाणेफेक जिंकून बंगळुरूला फलंदाजी करण्यासाठी आमंत्रण दिलं. चेन्नईच्या गोलंदाजांवर आक्रमक फटके लगावत देवदत्त पडीक्कलने 50 चेंडूत 70 धावांची उपयुक्त साकारली. तर कर्णधार विराट कोहलीने 50 धावांची खेळी करत संघाला महत्वाचं योगदान दिलं. त्यामुळे बंगळुरू संघाने चेन्नई संघाला 6 गडींच्या मोबदल्यात 156 धावाचं लक्ष्य दिलं. त्याआधी चेन्नईच्या ब्रावोनी बंगळुरूच्या फलंदाजांवर अंकुश ठेवत 3 गड्यांना तंबूत धाडलं होतं.

बंगळुरूने दिलेल्या 157 धावांचं आव्हान पार करताना चेन्नईची सुरूवात चांगली झाली. चेन्नईचे सलामीवीर फाफ डुप्लेसिस आणि ऋतुराज गायकवाड यांनी चेन्नईची एक्सप्रेस पुढे नेली. फाफ आणि ऋतूराज बाद झाल्यानंतर  मोईन अली आणि मिस्टर आयपीएल सुरेश रैनाने धावसंख्येचा पाठलाग केला. अखेर महेंद्रसिंह धोनी आणि सुरेश रैनाने नाबाद राहत सामना जिंकून दिला.

दरम्यान, या सामन्यात विराट कोहलीने शार्दुल ठाकूरला लगावलेल्या गगनचुंबी षटकारने सर्वांचंच मन जिकलं आहे. तर देवदत्त पडीक्कलची फलंदाजीने देखील सर्वांचं लक्ष वेधलं होतं.

थोडक्यात बातम्या-

नरेंद्र मोदींनी घेतली जो बायडन यांनी भेट; दोन दिग्गज नेत्यांमध्ये बैठक सुरू

कोरोना अपडेट! मुंबईच्या आकडेवारीत कमी अधिक प्रमाणात घट, वाचा आजची आकडेवारी

पुणे कोरोना अपडेट; जाणून घ्या आजची आकडेवारी एका क्लिकवर

विराट कोहलीचा गगनचुंबी षटकार! शार्दूलचा चेंडू थेट स्टेडियमबाहेरील रस्त्यावर; पाहा व्हिडीओ

“माझी हात जोडून विंनती आहे की, किरीट सोमय्यांना अडवू नका”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More