पुणे | पंजाब विरुद्धच्या सामन्यात धोनीचा गेम प्लॅन यशस्वी ठरला. त्यामुळे शेवटच्या साखळी सामन्यात चेन्नईने पंजाबवर 5 विकेट्सने विजय मिळवला.
या सामन्यात पंजाबने चेन्नईसमोर केवळ 154 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. पण पंजाबच्या गोलंदाजांनी केलेल्या अचूक माऱ्यासमोर चेन्नईची फलंदाजी कोलमडली. चेन्नई हा सामना गमावतेय का? अशी परिस्थिती झाली असताना धोनीने एक शक्कल लढवली. आपल्या प्रमुख फलंदाजांना मागे ठेऊन धोनीने हरभजन आणि दीपक चाहरला फलंदाजीसाठी पाठवलं. दीपकने 19 चेंडूत 39 धावा काढून चेन्नईला विजय मिळवून दिला.
दरम्यान, रैनाने या सामन्यात 61 धावांची खेळी केली. सरतेशेवटी धोनीने आपल्या खास अंदाजात षटकार मारुन हा सामना खिशात टाकला.
महत्त्वाच्या बातम्या –
-शरद पवारांनी पंतप्रधानपदाच्या स्वप्नातच राहावं; प्रकाश आंबेडकरांचा टोला
-राजनाथ सिंह यांच्यासाठी 20 गावांचा वीज तब्बल 12 तासांसाठी खंडीत
-शिवसेना-भाजप युतीचा मार्ग खडतर; भाजपकडूनही बोलणी बंद!
-…तोपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदींना पर्याय नाही- रामदास आठवले
-वडिलांच्या स्मृतिदिनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींचं भावनिक ट्वीट
Comments are closed.