खेळ

निवृत्तीनंतर काय करणार? धोनीने केला खुलासा…

नवी दिल्ली | भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आपल्या करिअरच्या अंतिम टप्प्यात आला आहे. यातच त्याने क्रिकेटमधील निवृत्तीनंतर काय करणार याचं उत्तर दिलं आहे.

धोनीने एक व्हीडिओ शेअर केला आहे. मला बालपणापासूनच चित्रकार बनायचं होतं, त्यामुळे निवृत्तीनंतर मला हा छंद जोपासायचा आहे, असं तो या व्हीडिओमध्ये म्हणत आहे.

मी खूप क्रिकेट खेळलो. आता मला पेंटींगमध्ये करिअर करायचं आहे. मी काही चित्रंही रेखाटली आहे, असं तो या व्हीडिओमध्ये म्हणाला.

धोनीने यानंतर त्याने काढलेली जी चित्रं दाखवली त्यामुळे चाहत्यांचा मात्र भ्रमनिरास झाला. त्याने चाहत्यांची थट्टा केली होती. त्याने यातून आपण निवृत्ती घेण्याच्या मूडमध्ये नसल्याचे संकेत दिले.

महत्वाच्या बातम्या

-काँग्रेसचे उमेदवार पडावे म्हणूनच ‘वंचित’ने उमेदवार उभे केले; अशोक चव्हाणांचा सनसनाटी आरोप

-“ईव्हीएम हॅकींगचा प्रयत्न सुरु आहे का?”

-निवडणूक संपताच ‘नमो टीव्ही’ चॅनल दूरचित्रवाणीवरुन गायब

-भोपाळमध्ये साध्वी की दिग्विजय सिंह? वाचा ‘न्यूज18’च्या पोलचा खळबळजनक अंदाज

-बहुमताची चाहूल लागताच भाजपच्या मंत्र्यांचं विचारमंथन

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या