Top News खेळ

हे वागणं बरं नव्हं! महेंद्रसिंग धोनीवर नेटिझन्स संतापले

दुबई | चेन्नई सुपर किंग्ज विरूद्धच्या सामन्यात सनरायझर्स हैद्राबादच्या केन विलियम्सनची एकाकी झुंज व्यर्थ ठरली आणि चेन्नईचा 20 धावांनी विजय झाला. चेन्नईचा हा तिसरा विजय असून सामन्यानंतर कर्णधार धोनीवर टीका होतेय.

19 व्या ओव्हरमध्ये शार्दूल ठाकूरचा पहिला चेंडू वाईड देण्यात आला. दुसरा चेंडूही त्याने तसाच टाकला. राशिदच्या बॅटला स्पर्श न चेंडू करता धोनीकडे गेला. नियमानुसार वाईड देण्यासाठी अंपायर खूण करणार तोच धोनी यांनी आरडाओरडा केला. त्यामुळे अंपायरने वाईड देण्याचा निर्णय रद्द केला.

धोनीचं असं वागणं नेटिझन्सच्या अजिबात आवडलेलं नाहीये. कॅप्टन कूल मिरवणारा धोनी रागाच्या भरात पंचांवर आवाज कसा काय चढवू शकतो? अशा टीका सोशल मिडीयावरून धोनीवर केल्या जातायत.

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या