बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धोनी चिडला… अन् ते पाहून अंपायरनं चक्क आपला निर्णयच बदलला!

दुबई | दुबईमध्ये रंगलेल्या चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद सामन्यात चेन्नईनं २० धावांनी विजय मिळवला. मात्र या सामन्यात चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं केलेल्या एका कृतीमुळे त्याला टीकेचा सामना करावा लागत आहे.

चेन्नईने हा सामना २० धावांनी जिंकला असला तरी शेवटच्या काही षटकांध्ये चांगलीच चुरस निर्माण झाली होती, हैदराबादनं महेंद्रसिंग धोनीच्या संघाला घाम फोडला होता. यावेळी झालेल्या एका घटनेची सोशल मीडियावर आता चांगलीच चर्चा रंगली आहे.

शार्दुल ठाकूरने टाकलेल्या १८ व्या षटकातील दुसऱ्या चेंडूला अंपायर पॉल राफेल वाईड चेंडू देण्यासाठी वळलेच होते, तोच शार्दुल ठाकूरने आक्षेप घेतला. त्या पाठोपाठ धोनीनंही जोरदार भाष्य करत अंपायरवर दबाव आणला.

धोनीच्या या भूमिकेमुळे वाईड चेंडू देण्यासाठी वळलेला आणि जवळपास दोन्ही हात निम्म्यापर्यंत वर केलेल्या अंपायरने हात खाली घेतले आणि आपला निर्णय मधेच बदलला. सनराझर्सचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरनंही या प्रकारावर नाराजी व्यक्त केली आहे.

 

 

हा प्रकार झाल्यानंतर सोशल मीडियातही याच्या प्रतिक्रिया उमटल्या नसत्या तरच नवल. ट्विटरवर #Dhoni आणि #Umpire ट्रेंड करत आहे. काही लोक धोनीच्या तर काही विरोधात ट्विट करत आहेत. त्यातील काही निवडक पण जबरदस्त ट्विट-

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

महत्त्वाच्या बातम्या-

पुढील तीन दिवस जोरदार पावसाने; महाराष्ट्राच्या ‘या’ भागातील नागरिकांनी सावध राहा!

बीडमध्ये धक्कादायक घटना; ट्रॅक्टर ड्रायव्हरकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोला कोरोनाची लागण

भाजप आमदार आशिष शेलार यांना धमकीचे फोन!

राज्यपालांची पत्रातील भाषा पाहून धक्का बसला; शरद पवारांचं पंतप्रधानांना पत्र

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More