बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धोनीच्या चेन्नईला मोठा झटका, हा निर्णय बसणार चेेन्नईच्या जिव्हारी?

मुंबई | आयपीएलच्या 14 व्या मोसमात (इंडियन प्रीमियर लीग) अजून एक महिना शिल्लक आहे. सर्व फ्रॅन्चायझींबरोबरच खेळाडू आणि क्रिकेट चाहतेसुद्धा उत्सुक आहेत. नुकत्याच झालेल्या लिलावात प्रत्येक संघाने अनेक फलंदाज निवडले आहेत. दरम्यान, गेल्या मोसमात साखळी फेरीत बाद झालेल्या महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जला 14 व्या मोसमाच्या अगोदर मोठा धक्का बसला आहे. ऑटोमोबाईलची सुप्रसिद्ध निर्मात्या स्कोडाने सीएसके यांच्या प्रायोजकत्वातून आपले नाव मागे घेतलं आहे.

चेन्नई आणि स्कोडा यांच्यात 25 कोटींच्या प्रायोजकत्वाचा करारनामा होणार होता. पण स्कोडाने हा करार न करण्याचा निर्णय घेतला आहे. चेन्नईसाठी हा मोठा धक्का आहे. अनेक फ्रेंचायझी आयपीएलमधील प्रायोजकत्वातून कोटी कमवतात. ‘मिन्त्रा’ अॅप चेन्नईबरोबर करार करण्याची शक्यता आहे. स्कोडा कंपनीने माघार घेतल्यानंतर आता प्रसिद्ध ई-कॉमर्स कंपनी मायन्ट्रा चेन्नईबरोबर करार करण्याची शक्यता आहे.

आयपीएलचा 13 वा सत्र चेन्नईसाठी निराशाजनक होता. सुरेश रैना आणि हरभजन सिंग या दोन महत्त्वाच्या खेळाडूंनी माघार घेतला होती. कर्णधार महेंद्रसिंग धोनी ही अपयशी ठरला. त्या मोसमात धोनीला धावांसाठी संघर्ष करावा लागला होता. पहिल्या 12 मोसमात चेन्नईने प्रत्येक वेळी प्लेऑफमध्ये अव्वल स्थान गाठलं होतं पण गेल्या मोसमात चेन्नईचे आव्हान बाद फेरीमध्येच संपलं होतं. त्यामुळे या मोसमात चेन्नई जोरदार पुनरागमन करण्यासाठी उत्सुक आहे.

दरम्यान, यंदाच्या वर्षी आयपीएलचे सामने मुंबई, बंगळूरु, चेन्नई, कोलकाता, अहमदाबाद आणि दिल्ली येथे सामन्यांचे आयोजन होणार आहे. मुंबईत मात्र प्रेक्षकांविना सामन्याच आयोजन होणार आहे. या वेळी राजस्थान राॅयल्स, सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्ज हे 3 संघ आपल्या घरच्या मैदानावर खेळू शकणार नाहीत.

थोडक्यात बातम्या –

धक्कादायक! सातवीतल्या मुलीने गळफास घेत संपवलं आपलं जीवन

डुकराचा बड्डे! या चिमुकलीची कल्पनाशक्ती पाहून सोशल मीडियावर सारेच हैराण, पाहा व्हिडीओ

बाप की सैतान?, ब्लेडने गळा कापून पित्याने केली आपल्या चिमुकलीची हत्या

“माझे आणि माझ्या बापाचे काय संबंध आहेत, बापालाच जाऊन विचार”

‘इतक्या’ रुपयांनी स्वस्त झालं सोनं; पाहा काय आहे आजचा भाव…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More