बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘गुरू VS शिष्य’ सामन्यात कोण ठरणार सरस? ; ‘या’ युवा खेळाडूच्या कामगिरीवर लक्ष

मुंबई | शुक्रवारी आयपीएलच्या झालेल्या पहिल्या रोमांचक सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने मुंबई इंडियन्सवर 2 गडी राखून विजय मिळवला. तर आज महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सचा सामना रिषभ पंतच्या दिल्ली कॅपिटल्सशी होणार आहे. मुंबईच्या वानखेडेवर होणाऱ्या या सामन्यात दोन्ही संघ विजयी सलामी देण्यास सज्ज झाले आहेत.

महेंद्रसिंग धोनी आणि रिषभ पंत या दोघांचं नातं गुरू आणि शिष्याचं आहे. रिषभ धोनीला आपला गुरू मानतो. धोनीकडून शिकलेल्या धडयांना आता आजमावता येईल, असं रिषभने म्हटलं होतं. कर्णधार म्हणून हा माझा पहिलाच सामना आहे आणि तो ही धोनी विरुद्ध आहे. त्यामुळे हा सामना माझ्यासाठी महत्वाचा आहे असं, रिषभ पंत म्हणाला होता.

चेन्नईच्या संघात सुरेश रैनाची एंट्री झाली आहे. तर दुसरीकडे सॅम करन, ऋतुराज गायकवाड, रवींद्र जडेजा त्यामुळे संघाला आणखी बळ मिळालं आहे. तर दिल्लीचा संघ युवा कर्णधारच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. अजिंक्य रहाणे, शिखर धवन, पृथ्वी शॉ, मार्कस स्टोनिस, हॅटमायर, रबाडा, नोर्जे यांसारख्या युवा खेळाडूंनी दिल्लीचा संघ भरला आहे.

दरम्यान, दिल्लीच्या संघाला माजी कर्णधार श्रेयस अय्यर याची कमतरता जाणवेल. नंबर 3 वर खेळणाऱ्या श्रेयसच्या जागी भारताचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे याला संधी मिळू शकते. तर स्टीव्हन स्मिथ दिल्लीच्या संघात आल्याने संघाची ताकद वाढली आहे.

थोडक्यात बातम्या-

कोरोनाऐवजी तीन महिलांना दिली रेबिजची लस, ‘या’ ठिकाणच्या घटनेमुळं एकच खळबळ

अखेर पुण्यावर केंद्राची कृपादृष्टी, कोरोना लसीचे 3 लाख 73 हजार डोस मिळणार

राज्यभरातील कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; सरकारकडून ‘या’ नियमात बदल

भिडे गुरुजींनी सरसंघचालक मोहन भागवतांना अपशब्द वापरले का?; संजय राऊतांच्या फॅनपेजवरुन सवाल

“…त्यांना संभाजी भिडेंच्या भाषेत ‘गांडू’च म्हणावं लागेल”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More