बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धोनीच्या संघातील ‘हा’ खेळाडू बनणार भारतीय संघाचा नवा ऑलराऊंडर, घेणार हार्दिक पांड्याची जागा!

नवी दिल्ली | शार्दुल ठाकूरकडे वेगवान गोलंदाजीत अष्टपैलुत्व सिद्ध करण्याची क्षमता आहे. हार्दिक पांड्या पाठीच्या दुखण्यामुळे गोलंदाजी करू शकत नव्हता, त्यावेळी शार्दुल मदतीला धावून आल्याचे मत भारतीय संघाचे गोलंदाजी कोच भरत अरुण यांनी व्यक्त केले. हार्दिक गोलंदाजी करण्याच्या स्थितीत नसल्यामुळे ‘बीसीसीआय’ने इंग्लंड दौऱ्यासाठी त्याचा विचार केलेला नाही. अशा स्थितीत पुढील पर्यायाचा शोध घेणे निवडकर्त्यांचे काम असले तरी, ठाकूरने स्वत:ची उपयुक्तता सिद्ध केली. अष्टपैलू बनू शकतो, हे शार्दुलने प्रत्यक्षात खरे ठरविले आहे.

पांड्या 2018 च्या इंग्लंड दौऱ्यात अखेरचा कसोटी सामना खेळला. 2019 च्या मोसमात तो पाठदुखीमुळे त्रस्त होता. अलीकडे ‘आयपीएल’ सामन्यादरम्यान त्याच्या खांद्याला देखील दुखापत झाली. पांड्यासारख्या चांगल्या पर्यायाचा शोध घेणे काळाची गरज आहे. हार्दिकमध्ये प्रतिभा आहे. त्याच्यासारखा गोलंदाज तयार करणे खरे तर कठीणच आहे. पाठीच्या शस्त्रक्रियेनंतर संघात पुनरागमन करणे त्याला कठीण जात आहे, असं त्यांनी सांगितलं.

दोन कसोटी सामन्यांचा अनुभव असलेल्या शार्दुलने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात ब्रिस्बेन कसोटीत अर्धशतकी खेळी केली. शिवाय सात गडी बाद केले होते. आम्हाला गोलंदाजीत अष्टपैलू शोधण्याची गरज आहे. नियमितपणे भारतीय संघासोबत वास्तव्य असल्याने मी स्वत: स्थानिक सामन्यात अशा खेळाडूंचा शोध घेऊ शकत नाही. शार्दुलला इंग्लंड दौऱ्यात पुरेशी संधी मिळणार असल्याने गोलंदाजी अष्टपैलू म्हणून त्याच्या प्रतिभेत आणखी भर पडेल, अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, इंग्लंड दौऱ्यात गोलंदाजांवरील भार कमी करण्यासाठी डब्ल्यूटीसी फायनलसह सहा कसोटीत रोटेशन धोरणाचा अवलंब केला जाईल, अशी माहिती देखील भरत अरुण यांनी दिली

थोडक्यात बातम्या – 

मनसे नेते अमित ठाकरे यांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र, म्हणाले…

“भर चौकात उभं नाही केलं तर माझं नाव रंजीत रंजन नाही”

100 वर्षांआधीचं ‘हे’ औषध ठरतयं ब्लॅक फंगसवर गुणकारी भारतीय डाॅक्टरचा दावा

फक्त एकच डोस पुरेसा!; ‘या’ लस उत्पादक कंपनीनं भारतासंदर्भात घेतला मोठा निर्णय

“टिकटॅाकसारखे व्हिडीओ बनवा पैसे कमवा”; यूट्यूबची मोठी घोषणा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More