बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

#T20WorldCup | धोनीचं पुनरागमन! बीसीसीआयने दिली ‘ही’ मोठी जबाबदारी

मुंबई | भारतीय नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने आज आगामी विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. भारतीय संघात कोणाला स्थान दिलं जाईल याची सर्वांनाच उत्सुकता होती. त्यानंतर आता बीसीसीआयने भारताच्या 18 शिलेदारांची नावं जाहीर करण्यात आली आहेत.

बीसीसीआयने 18 खेळाडूंची नावं जाहीर करत आणखी एक मोठा सुखद धक्का दिला आहे. भारताचा माजी कर्णधार आणि कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनी संघाचा मेन्टाॅर असणार आहे. त्यामुळे आता धोनीच्या चाहत्यांना देखील आनंद झाला आहे.

भारतीय संघात विराट कोहली (कॅप्टन), रोहित शर्मा, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, इशान किशन, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, राहुल चहर, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह , भुवनेश्वर कुमार, आणि मोहम्मद शमी यांना संधी देण्यात आली आहे.

दरम्यान, श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकूर, दिपक चाहर या तीन खेळाडूंना राखीव ठेवण्यात आलं आहे. 17 ऑक्टोबर ते 14 नोंव्हेबर या कालावधीत वर्ल्डकपचा थरार रंगणार आहे.

थोडक्यात बातम्या-

“राणे कुटुंबीय म्हणजे येड्यांची जत्रा”

1 नोव्हेंबर पासून ‘या’ स्मार्टफोन, अॅन्ड्रॉईडफोनमधून व्हॉट्सअॅप सपोर्ट बंद होणार

कोरोनाबाबत केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावरून किशोरी पेडणेकरांचा यु टर्न; म्हणाल्या…

“मराठा आरक्षण बैठकीला सरकार तयार होत नसेल तर…’; खासदार संभाजीराजेंचा ठाकरे सरकारला इशारा

“डिस्को आणि बार ही काय आरोग्य केंद्रे आहेत का?”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More