Top News आरोग्य कोरोना धुळे

धुळ्यातील प्रसिद्ध डाॅक्टर चुडामण पाटील यांचं कोरोनामुळे निधन

धुळे | धुळ्यामध्ये कोरोनामुळे एका प्रसिद्ध डॉक्टरचा मृत्यू झाला आहे. धुळ्यातील प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. चुडामण पाटील यांचं मंगळवारी कोरोनामुळे निधन झालं आहे.

यापूर्वी देखील देशात कोरोनामुळे काही डॉक्टरांचा मृत्यू झाला होता. तर आता कोरोनाने धुळ्यातील प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. चुडामण पाटील यांचा मृत्यू झाला आहे.

काही दिवसांपूर्वी डॉ. पाटील यांनी कोरोना चाचणी केली होती. त्यांची कोरोनाची चाचणी पॉसिटीव्ह आल्याचं समजल्यावर त्यांना तातडीने पुण्याचीत एका खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरु होते. कोरोनाशिवाय त्यांवा स्वादुपिंडाचा देखील त्रास होता.

कोरोना आणि स्वादुपिंडाच्या आजाराशी झुंज देत असताना मंगळवारी संध्याकाळी त्यांचा मृत्यू झाला. कोरोनाची लागण होण्याअगोदरही ते रूग्णांची तपासणी करत होते. नुकतंच त्यांनी वाडीभोकर रोडवर पंचायत समितीच्या समोर अद्ययावर रूग्णालय उभारलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या-

पुण्यात कोरोनाचा आकडा वाढताच, वाचा आजची आकडेवारी

कोरोनामुळे मंदावलेल्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी…, मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी…., आरोग्यमंत्री राजेश टोपेंच्या महत्त्वाच्या सूचना

“राज्यात ‘या’ 20 आजारांवर मोफत उपचार, पैसे घेतले तर रुग्णालयांना पाचपट दंड”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या