धुळे महाराष्ट्र

पहिल्यांदा बोकड पार्टीवर ताव अन मग श्रीरामाचं नाव, धुळ्यातील भाजप कार्यकर्त्यांचा प्रताप!

धुळे | अयोध्येतील राम मंदिर भूमिपूजनाचा समारंभ काल भक्तीमय वातावरणात पार पडला. सबंध देशभरातील भाजप कार्यकर्त्यानी दिवे लागण करत तर मिठाई वाटत आपला आनंद व्यक्त केला. मात्र धुळे जिल्हा परिषदेचे भाजप सदस्य यादिवशी बोकडाच्या पार्टीत दंग असल्याचं पहायला मिळालं. विशेष म्हणजे पार्टीचा कार्यक्रम आटोपल्यावर त्यांनी राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याचा आनंदोत्सवही साजरा केला.

गोदुर गावाजवळ साई लक्ष्मी लॉन्स येथे जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना आणि सदस्यांना मटणाचे जेवण ठेवण्यात आले. मात्र या लॉनच्या संचालकांनी अयोध्या येथे श्री राम मंदिर भूमिपूजनाचा कार्यक्रम असल्यानं आपण मटणाचे जेवण करू देणार नाही, अशी स्पष्ट ताकीदच या भाजप कार्यकर्त्यांना दिली.

अखेर लॉन्सच्या प्रवेशद्वारा लगत असलेल्या शेतातील झोपडीत मटणाचा बेत वळविण्यात आला. यादरम्यान जवळपास पदाधिकारी, सदस्य आणि त्यांच्या कुटुंबियांनी मिळून 3 बोकडांचं मटन फस्त केलं. मटनाचा बेत पूर्ण झाल्यावरच सर्वसाधारण सभा पार पडली.

मात्र यावेळेस राम मंदिराच्या भूमिपूजनाचा आनंदोत्सव साजरा करण्याचा मोह या कार्यकर्त्यांना आवरला नाही. त्यामुळे भूमिपूजनाच्या पवित्र दिवशीच मटनाचा फडशा पाडून रामाचा जयघोष केल्यानं पंचक्रोशीतील नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

महत्वाच्या बातम्या-

बॉलिवूडला धक्का, अभिनेता समीर शर्माने गळफास घेऊन केली आत्महत्या

पहिल्यांदा घरातील 7 सदस्यांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह, आता खा. नवनीत राणा यांनाही कोरोनाची लागण

मंदिरे बंद ठेऊन राज्य सरकारनं आडमुठेपणा केला आहे- गिरीश महाजन

“विजयदुर्गची पडझड रोखण्यासाठी आजची बैठक सकारात्मक, शिवभक्तांच्या वतीने मंत्रीमहोदयांचे आभार”

प्रसिद्ध मॉडेल ते UPSC परीक्षेत ९३ वी रँक… , या तरुणीचा प्रेरणादायी प्रवास वाचून थक्क व्हाल..!

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या