नाशिक महाराष्ट्र

धुळ्याच्या साक्रीत ‘महाविकासआघाडी’ तर बाकी तीनही पंचायत समित्यांवर भाजपचा बोलबाला

धुळे | धुळे जिल्ह्यातल्या चारही पंचायत समित्यांची सभापती आणि उपसभापती यांची आज निवड प्रक्रिया पार पडली. या निवड प्रक्रियेत धुळे, शिंदखेडा आणि शिरपूर पंचायत समित्या या भाजपकडे तर साक्री पंचायत समिती मात्र महाविकासआघाडीकडे गेली आहे.

धुळे तालुका पंचायत समितीवर पुन्हा एकदा माजी आमदार द. वा. पाटील यांच्या गटाने बाजी मारली आहे. विजय पाटील हे सभापती आणि विद्याधर पाटील हे उपसभापती झाले आहेत.

शिंदखेडा पंचायत समितीच्या सभापतीपदी वैशाली सोनवणे तर उपसभापतीपदी नारायणसिंग गिरासे यांची निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

शिरपूरमध्ये सभापतीपदी भाजपचे सत्तारसिंग नावखा पावरा यांची तर उपसभापतीपदी भाजपच्या धनश्री योगेश बोरसे यांची बिनविरोध निवड झाली. तर साक्रीत सभापतीपदी प्रतिभा सूर्यवंशी व उपसभापतीपदी नरेंद्र मराठे यांची निवड झाली आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

“शिवाजी महाराज आणि त्यांच्या वंशजांबद्दल वाकडं बोलाल तर जीभ जागेवर राहणार नाही”

फडणवीसांच्या काळात वर्षा बंगल्यावर गुंडांचा वावर; बाळासाहेब थोरातांचा आरोप

“केवळ आंदोलनांवरच भागवू नका तर पुन्हा मराठा स्वाभिमान मोर्चा काढा”

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या