Dhule Shindkheda Accident | शिंदखेडा तालुक्यात एक भीषण अपघात घडला आहे. दसवेल फाट्याजवळ पिकअप व्हॅन आणि ईको गाडीची समोरासमोर धडक झाली. या घटनेत 4 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात अत्यंत भीषण होता. चार जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाले. (Dhule Shindkheda Accident)
शिंदखेडा तालुक्यातील दसवेल फाट्याजवळ रात्री दोन वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात घडला. नरडाणा येथे भागवत कथेचा कार्यक्रम करून घरी परतताना इको व्हॅनला दसवेल फाट्याजवळ भरधाव पिकपने जोरदार धडक दिली. मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश असल्याची माहिती मिळत आहे.
धुळ्यात पिकअप-ईकोची समोरासमोर धडक,
हा अपघात इतका भीषण होता की, गाड्यांचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. अपघात झाल्याचे कळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. काही प्रत्यक्षदर्शींकडून पिकअप वाहनाचा चालक हा मद्यधुंद अवस्थेत असल्याचे देखील म्हटले जात आहे. या अपघातामुळे धुळ्यात शोककळा पसरली आहे. (Dhule Shindkheda Accident)
छत्रपती संभाजीनगर येथील अपघाताची घटना ताजी असतानाच धुळे जिल्ह्यात हा अपघात घडला आहे. या अपघातानंतर जखमींना तातडीने धुळ्यातील हिरे रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. छत्रपती संभाजीनगर येथे दहा वर्षांनंतर झालेल्या बाळाचे बारसे आटोपून पुण्याला जाणाऱ्या कुटुंबाच्या कारला दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या तरुणांच्या स्कॉर्पिओने धडक दिली.
भागवत कथेच्या कार्यक्रमाहून परतताना भीषण अपघात
या अपघातात आजी आणि आईसह दीड महिन्याच्या बाळाचा मृत्यू झाला. लिंबेजळगाव परिसरातील टोलनाक्याजवळ हा अपघात घडला. त्यानंतर आज धुळ्यात शिंदखेडा तालुक्यातील दसवेल फाट्याजवळ एक भीषण अपघात घडला. या घटनेनंतर धुळ्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Dhule Shindkheda Accident)
News Title – Dhule Shindkheda Accident
महत्त्वाच्या बातम्या-
सोनं पुन्हा रेकॉर्ड मोडणार?, एकाच दिवसात झाली तब्बल ‘इतक्या’ हजारांची दरवाढ
“विरोधकांनी पंतप्रधान पदाची ऑफर होती, पण..”; नितीन गडकरींचा मोठा खुलासा
सर्वसामान्यांना झटका! खाद्य तेलाच्या दरात झाली मोठी वाढ
महादेवाच्या कृपेने आज ‘या’ 5 राशींना लाभच लाभ मिळणार!
अखेर अनन्याकडून आदित्य राॅय कपूरसोबतच्या ब्रेकअपबद्दल खुलासा!