धुळे महाराष्ट्र

धुळ्यात मयताच्या टाळूवरचं लोणी खाल्लं… मृत महिलेच्या अंगावरील 80 हजार रूपयांचे दागिने गायब!

धुळे | धुळे जिल्ह्यातील साक्री शहरात मयताच्या टाळूवरील लोणी खाण्याचा प्रकार घडला आहे. कोरोनाने मृत पावलेल्या महिलच्या अंगावरील 70 ते 80 हजार रूपयांचे दागिने रूग्णालयातून गायब झाले. याबद्दल रूग्णालय प्रशासनाला विचारलं असता त्यांनी हात वर केले.

साक्री शहरातील सुतार गल्लीतील ६५ वर्षीय महिलेचा कोरोना तपासणी अहवाल २८ जूनला पॉझिटिव्ह आला. त्यानंतर या महिलेला धुळ्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उपचारादरम्यान ११ जुलैला दुपारी या महिलेचा मृत्यू झाला. याबाबतची माहिती रुग्णालय प्रशासनानं महिलेच्या कुटुंबीयांना दिली. त्यानंतर अंत्यविधी करण्यासाठी महिलेच्या मुलासह दोन नातेवाईक धुळ्यात आलेत.

रुग्णालयात मुलाने आईचे अंत्यदर्शन घेण्याची इच्छा व्यक्त केली. आईचा चेहरा पाहताना तिच्या गळ्यातील मंगलपोत, कानातील बाळ्या , नाकातील नथ आदी सोन्याचे दागिने गायब झाल्याचे त्याला दिसले, ते कुठे आहे अशी विचारणा केली; परंतु त्यावेळी कर्मचाऱ्यांनी टाळाटाळ करत लगेच अंत्यविधीसाठी मृतदेह पॅक करून दिला. त्यानंतर वेळोवेळी चाैकशी करूनही आईचे दोन तोळे सोन्याचे दागिने मिळाले नाही.

त्यामुळे साधारण ७० ते ८० हजार रुपये किमतीचे दागिने रुग्णालयातच कर्मचाऱ्यांनी काढून घेतले अशी तक्रार मृत महिलेच्या मुलाने केलीय .तर यासंदर्भात साक्री तालुका भाजपने पोलीस निरीक्षकांना निवेदन देत मृत महिलेच्या अंगावरील दागिने काढणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केलीय. दोषींवर कारवाई न झाल्यास  आंदोलनाचा इशारा देखील दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

राम मंदिराच्या भूमीपुजनाचा मुहूर्त ठरला!

राष्ट्रवादीला धक्का, सानेकाकांनंतर आणखी एका कर्तबगार नगरसेवकाचा कोरोनामुळे मृत्यू!

अरे बापरे… कोरोनाचा आतापर्यंतचा रेकॉर्ड, गेल्या 24 तासांत नोंद झाला सर्वाधिक आकडा!

तरुणाच्या गुप्तांगावर लोखंडी गजाने वार; धक्कादायक घटनेनं बीड हादरलं!

…म्हणून लोक तहसीलदारालाच मारायला धावले; कोविड केअर सेंटरमधील नागरिकांवर गुन्हा दाखल

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या