WhatsApp चं आणखी एक जबरदस्त फीचर घालणार धूमाकुळ

मुंबई| सध्या कोणाच्या मोबाईलमध्ये WhatsApp नाही असं होतच नाही. WhatsApp वापरणं हे अनेकांच्या जीवनाचा दैनंदिक भाग झाला आहे. त्यामुळं WhatsApp वापरकर्त्यांची संख्या करोडोमध्ये आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून WhatsApp नवनवीन फीचर्स(WhatsApp New Feature) आणत आहे, त्यामुळं WhatsApp वापरणं आणखी मजेशीर झालं आहे. त्यातच आता पुन्हा एकदा WhatsApp नं भन्नाट फीचर आणलं आहे. त्यामुळं वापरकर्ते आणखी खुश होणार आहेत.

नवीन फीचर हे WhatsApp स्टेटसशी निगडीत आहे. या फीचरद्वारे यूजर्सला डेस्कटाॅप बीरावर स्टेटस अपेडट करण्याची तक्रार करता येणार आहे. म्हणजे जर वापरकर्त्यांना एखादे स्टेटस नियामांचे उल्लंघन करणारे आहे, असे वाटल्याल ते तुम्हाला रीपोर्ट करता येणार आहे.

तुम्ही रीपोर्ट केल्यानंतर ते स्टेटस कंपनीकडं माॅडरेशन कारणामुळं फाॅरवर्ड केले जाणार, त्यानंतर नियमांचे उल्लंघन झाले आहे की नाही हे कंपनी तपासून पाहणार आहे.

दरम्यान, लवकरच हे नवीन फीचर WhatsApp डेस्कटाॅप बीटासाठी वापरता येणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More