बापरे! WhatsApp चं आणखी एक जबदरदस्त फीचर्स घालणार धुमाकूळ

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | सध्या कोणाच्या मोबाईलमध्ये WhatsApp नाही,असं होतच नाही. WhatsApp वापरकर्त्यांची संख्या करोडोमध्ये आहे. WhatsApp वापरणं हे अनेकांच्या दैनंदिक जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे.

त्यातच गेल्या काही दिवसांपासून WhatsAppने अनेक नवनवीन फीचर्स आणले आहेत. त्यामुळं WhatsApp वापरणं आता आणखी मजेशीर झालं आहे. त्यातच आता पुन्हा एकदा WhatsApp वापरकर्त्यांसाठी गुड न्यूज समोर आली आहे, कारण WhatsApp नं एक भन्नाट फीचर आणलं आहे.

या नवीन फीचरद्वारे तुम्ही डिलीट केलेला मेसेज सुद्धा परत आणता येणार आहे. बऱ्याचदा आपल्याकडून असं होतं की, आपल्याला डिलीट फोर एव्हरीवन करायचं असतं पण चुकून आपल्याकडून डिलीट फोर मी या ऑप्शनवर क्लिक होतं. आता नवीन फीचर्सद्वारे आपल्या मोबाईलमधून डिलीट झालेल्या मेसेज पुन्हा परत आणणं शक्य झालं आहे.

WhatsApp ‘अॅक्सि़डेंटल डिलीट’ हे नवीन फीचर आणत आहे. जर तुम्ही डिलीट फोर मी या पर्यायावर क्लिक केलं असेल तर तुम्हाला ‘अनडू’ चा ऑप्शनवर क्लिक करावं लागेल. यानंतर पूर्ववत पर्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला डिलीट झालेला मेसेज पुन्हा दिसेल.

परंतु डिलीट झालेला मेसेज पुन्हा आणण्यासाठी तुम्हाला फक्त पाच सेंकदाचा कालावधी मिळणार आहे. या फीचर्सचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला WhatsApp अपडेट करून घ्यावं लागेल.

महत्वाच्या बातम्या-