पुणे महाराष्ट्र

समाजकार्यासाठी संपूर्ण जीवन समर्पित करणारे, ‘स्व’-रुपवर्धिनीचे ज्ञानेश पुरंदरे यांचं निधन

पुणे | स्व-रुपवर्धिनीचे पूर्णवेळ कार्यकर्ते ज्ञानेश पुरंदरे अर्थात ‘ज्ञापु’ यांचं बुधवारी दुपारी निधन झालंय. कोरोनामुळे त्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यांना कोरोनाची लागण झाली होती आणि गेले दोन आठवडे ते कोरोना संसर्गाने आजारी होते. आजाराची गुंतागुंत वाढल्याने त्यांच्यावर खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात गेल्या आठवडाभरापासून उपचार सुरू होते. अखेर त्यांची ही झुंज अपयशी ठरली आहे.

अभियांत्रिकीचे शिक्षण झाल्यानंतर त्यांनी काही काळ बजाज ऑटोमध्ये नोकरी केली होती. स्व-रूपवर्धिनीचे पूर्ण वेळ काम करण्यासाठी त्यांनी 1996 मध्ये नोकरीचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून ते स्व-रूपवर्धिनीच्या विविध जबाबदाऱ्या पार पाडत होते.

काही वर्षांपासून त्यांच्याकडे कार्यवाहपदाची जबाबदारी होती. शिवचरित्राचे फर्डे व्याख्याते म्हणूनही महाराष्ट्रभर त्यांची ओळख आहे. पुण्यातील गुजरवाडीमध्ये ओंकार न्यासचेही ते विश्वस्त होते. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ते स्वयंसेवक होते.

स्व-रूपवर्धिनीचे सहकार्याध्यक्ष संजय तांबट यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुरंदरे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी रविवारी 2 ऑगस्ट रोजी श्रद्धांजली सभा घेण्यात येणारे. संस्थेचे कार्यवाह म्हणून समाजातील दुर्लक्षित घटकांना शिक्षण आणि कौशल्य विकासातून मुख्य प्रवाहात आणण्याचं काम पुरंदरे यांनी उत्तम पद्धतीने पार पाडलं.” ‘विकसित व्हावे, अर्पित होऊनि जावे’ हे स्व-रुपवर्धिनीचे ब्रीदवाक्‍य त्यांनी सार्थ केल्याची कृतज्ञ भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केलीये.

महत्वाच्या बातम्या-

गलवानमध्ये शहीद झालेल्या कर्नल संतोष बाबू यांची पत्नी झाल्या उपजिल्हाधिकारी

Chutia लिहिल्यानं स्वीकारला जात नव्हता नोकरीचा अर्ज, अखेर तरुणीनं उचललेल्या पावलानं घडला चमत्कार!

श्रावण महिना सुरू झालाय आता…; चंद्रकांत खैरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र!

महाराष्ट्रात पुन्हा जिम, शॉपिंग मॉल सुरु करण्याचा सरकारचा विचार- राजेश टोपे

6 वेळा विधानसभा, 1 विधानपरिषद, 7 लोकसभा, दोनदा राज्यसभा; शरद पवारांनी घेतली सोळाव्यांदा शपथ

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या