बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पर्यावरणाविषयी बोलताना दिया मिर्झा ढसाढसा रडली!

मुंबई | बाॅलिवूड अभिनेत्री दिया मिर्झा काही वर्षांत कला क्षेत्रापासून लांब असलेली दिसत आहे. अभिनय क्षेत्रापासून दूर असली तरी सोशल मि़डियाद्वारे ती नेहमीच पर्यावरणाविषयी बोलताना दिसते. यातच तिचा रडतानाचा व्हीडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होतोय.

दिया मिर्झा काही दिवसांपूर्वी जयपूर लिटरेचर फेस्टीवलमध्ये उपस्थित होती. यावेळी पर्यावरण आणीबाणी विषयी बोलताना तिला अश्रू अनावर झाले. दिया मिर्झाचा हा व्हिडीओ एएनआय या वृत्तसंस्थेने आपल्या ट्विटर हॅन्डलवरून शेअर केला आहे.

‘पर्यावरण ही गोष्ट समजून घ्या, पूर्णपणे आणि नीट समजून घ्या, ती गोष्ट सुंदर आहे… हीच आपली खरी ताकद आहे. हेच आपण आहोत आणि हा कोणताही परफॉर्मन्स नाही, असं पर्यावरण आणीबाणी विषयी बोलताना दियानं म्हटलं आणि याच वेळी बोलताना तिला आपले अश्रू रोखता आले नाही.

दिया पर्यावरणाबाबत नेहमीच जागृत असते. ती सोशल मिडीयावरून कायम चाहत्यांच्या संपर्कात असताना दिसते.

 

ट्रेंडिंग बातम्या –

अजित पवार मुख्यमंत्री असल्यासारखे वागतात; चंद्रकांत पाटलांचं टीकास्त्र

विराट कोहलीचा जबरदस्त स्टंट; व्हिडीओ व्हायरल!

महत्वाच्या बातम्या –

कुणाचीही चौकशी करा, आम्ही नाही घाबरत जा- चंद्रकांत पाटील

“गडकरीजी…आपण एका गाडीत बसलो नाही तरी एकाच स्टेशनवर एकत्र आलो”

“अशोक चव्हाण यांच्या बोलण्याची पद्धत चुकीची”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More