बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दिया मिर्झाने दिला बाळाला जन्म, ‘या’ कारणामुळे दोन महिन्यानंतर दिली माहिती

मुंबई | बाॅलिवूड अभिनेत्री दिया मिर्झा अलिकडे प्रचंड चर्चेत होती. सर्वात आधी ती तिच्या लग्नामुळे चर्चेत आली होती. आपल्या पहिल्या पतीसोबत घटस्फोट झाल्यानंतर तिने पुन्हा उद्योगपती वैभव रेखी यांच्यासोबत लग्न केल्यामुळे ती प्रचंड चर्चेत आली होती. त्यानंतर लग्नाआधीच गरोदर राहिल्याची माहिती समोर आल्याने दियाला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं होतं. अशातच तिने आता आपल्या बाळाची माहिती देत इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे.

दियाने 14 मे ला मुलाला जन्म दिला असून त्याचं नाव अव्यान आझाद असं ठेवण्यात आलं आहे. याबाबतची एक पोस्ट देखील दियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केली आहे. यामध्ये दियाने वेळेआधीच आपल्या बाळाला जन्म दिला असल्याचं तिने लिहीलं आहे. यानंतर आपल्याला बॅक्टेरिअल इंफेक्शन झाल्यामुळे गरोदरपणात जीव जाईल, अशी तिची अवस्था झाली असल्याचं तिने सांगितलं आहे.

वेळेआधीच जन्म झाल्यामुळे दियाच्या बाळाला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. दियाच्या पोस्टवर तिचे चाहते भरभरुन प्रेम दाखवत असून दियाने देखील सर्वांचे आभार मानले आहेत. यादरम्यान, बाळाचे आजी- आजोबा देखील त्यांच्या नातवाला कुशीत घेऊन त्याला खेळवण्यासाठी उत्सुक असल्याचं दियाने पोस्टमध्ये लिहीलं आहे.

दरम्यान, दियाने आपल्या बाळाचा चेहरा अद्याप दाखवलेला नाही. मात्र बाळाला हातात हात घेऊन एक पोस्ट शेअर करत तिने ही गोड बातमी सर्वांना दिली आहे. आता मात्र तिचे चाहते तिच्या मुलाचा चेहरा पाहण्यासाठी उत्सुकता दाखवत आहे.

पाहा पोस्ट:

 

View this post on Instagram

 

A post shared by Dia Mirza (@diamirzaofficial)

थोडक्यात बातम्या-

उद्धवजी, आषाढी एकादशीला तुम्ही शरद पवारांनाच अभिषेक करा- अतुल भातखळकर

मी राजकियदृष्ट्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विरोधात आहे- उद्धव ठाकरे

प्रशांत किशोर यांनी घेतली राहुल गांधींची भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

…त्यामुळे पंकजा मुंडे कधीच बंडाचा विचार करणार नाहीत- चंद्रकांत पाटील

“ताई, तुमच्या पक्षात पंख छाटणारा शकुनी मामु मोठा चतुर आहे, हे विसरू नका”

 

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More